दानवाडमध्ये ‘ग्राहक दिन’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:32 AM2020-12-30T04:32:02+5:302020-12-30T04:32:02+5:30
या वर्षीच्या ३४ व्या राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाच्या निमित्ताने नवे दानवाड हे गाव निवडून तिथे ग्राहक जागृती मोहीम ...
या वर्षीच्या ३४ व्या राष्ट्रीय ग्राहक दिन सप्ताहाच्या निमित्ताने नवे दानवाड हे गाव निवडून तिथे ग्राहक जागृती मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्राहकांच्या हक्कासंबंधीची माहिती ग्राहकांना व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहक पंचायतीचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘ग्राहक दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायतीचे आद्य जनक ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हरिश्चंद्र कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी अभिजित पाटील, अॅड. राजेंद्र वायगणकर, जिल्हाध्यक्ष बी. जे. पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, अशोक पोतनीस, आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सरपंच वंदना कांबळे, उपसरपंच शहानूर गवंडी, ‘तंटामुक्त’चे अध्यक्ष रावसो कुंभोजे, प्रकाश परीट, रामा कांबळे, रामा बेरड, शोभा परीट, कमल कांबळे, संगीता कांबळे, पांडुरंग धनगर, भगतसिंग शिलेदार, सूर्यकांत बेरड, प्रकाश बेरड, शिवाजी साळुंखे, राजू कांबळे, सुरेश माने, दादासो शेलार, संजय पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सदाशिव आंबी यांनी आभार मानले.