संकेश्वरमध्ये मिरची खरेदीकडे ग्राहकांचा ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:36+5:302021-04-17T04:22:36+5:30
परिसरातील नेर्ली, व्हन्नीहळ्ळी, आमणगी आदी गावांत संकेश्वर मिरचीचे दर्जेदार बियाणे शिल्लक आहेत. अलीकडे जवारी मिरचीचे उत्पन्न कमी प्रमाणात घेतले ...
परिसरातील नेर्ली, व्हन्नीहळ्ळी, आमणगी आदी गावांत संकेश्वर मिरचीचे दर्जेदार बियाणे शिल्लक आहेत. अलीकडे जवारी मिरचीचे उत्पन्न कमी प्रमाणात घेतले जाते. कारण, जवारी मिरचीवर मुटºया रोगाचा प्रादुर्भाव अधिक होत आहे.
दरम्यान, या जवारी मिरचीवर येणारा खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी जवारी मिरचीचे पीक घेण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आणखी काही वर्षांत जवारी मिरचीचे वाण नष्ट होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
आजही अनेक व्यापारी व किरकोळ विक्रेते जवारी मिरचीच्या नावाखाली अन्य वाणांच्या मिरच्या विकून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनीही चौकस राहणे गरजेचे आहे.
सध्या बाजारपठेत ब्याडगी ३००, लवंगी २०० तर हुबळी गरूडा २०० रुपये किलो आहे..अन्य मिरचीच्या तुलनेत संकेश्वरी मिरचीची चव वेगळी असल्याने याला सर्वाधिक मागणी आहे. सध्या ६०० ते १२०० रुपयांपर्यंत संकेश्वरी मिरचीचा दर सुरू आहे.
------------------------
फोटो ओळी : संकेश्वर येथील आठवडा बाजारात विक्रीसाठी आलेल्या मिरच्या.
क्रमांक : १६०४२०२१-गड-०५