ग्राहकांच्या खिशातून उत्पादकांच्या पदरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:03+5:302021-07-10T04:18:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’ने दूध उत्पादकांना दोन व एक रुपया दरवाढ करत असताना ग्राहकांच्या खिशातून मात्र ...

From the consumer's pocket to the manufacturer's position | ग्राहकांच्या खिशातून उत्पादकांच्या पदरात

ग्राहकांच्या खिशातून उत्पादकांच्या पदरात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’ने दूध उत्पादकांना दोन व एक रुपया दरवाढ करत असताना ग्राहकांच्या खिशातून मात्र दोन रुपये काढून घेतले आहेत. गेल्या दोन महिन्यांत काटकसरीचा कारभार करत कोट्यवधी रुपयांची बचत केल्याचे संचालक सांगत होते. ग्राहकांच्या माथी न मारता केवळ काटकससरीच्या माध्यमातून उत्पादकांना दोन रुपये जादा देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात ग्राहकांकडून घेऊन उत्पादकांना दिले यामध्येही गाय दूध उत्पादकांबाबत दुजाभाव केला आहे.

‘गोकूळ’मधील मनमानी कारभाराविरोधात रान उठवत नेत्यांनी सत्तांतर घडवले. सत्तेवर आल्यानंतर काटकसरीचा कारभार करत उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे वचन दिले होते. नवीन संचालकांनी काटकसरीचा कारभार करत अनेक बचतीचे निर्णय घेतले. कोट्यवधी रुपयांची बचत केल्याने दूध उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. याबाबत उत्पादकांकडून दरवाढीची विचारणाही होऊ लागली. मात्र लगेच निर्णय घेता येणार नसल्याचे नेत्यांनी सांगितले. तोपर्यंत ‘अमूल’ने विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ‘गोकूळ’नेही दरवाढीबाबत विचार सुरू केला. विक्री दरात दोन रुपयांची वाढ करून तेच दूध उत्पादकांना देण्यात आले. ग्राहकांच्या खिशातून काढून उत्पादकांच्या पदरात टाकले, यामध्ये ‘गोकूळ’ने काय केले. उलट गाय दूध ग्राहकांकडून दोन रुपये घेतले आणि उत्पादकाला मात्र रुपयाच दिला. असा दुजाभाव केला तर एकट्या म्हैस दूध वाढवून वीस लाख लिटरचा टप्पा तीन वर्षांत सोडाच दहा वर्षांतही गाठता येणार नाही, हे निश्चित आहे.

फुलाच्या पायघड्या घालून नेत्यांचे स्वागत

‘गोकूळ’च्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच दूध दरवाढीची घोषणा संघाच्या नेत्यांनी केली. त्याचबरोबर नेत्यांच्या स्वागतासाठी ताराबाई पार्क कार्यालयाच्या पायऱ्यांवर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. औक्षण करून नेते पत्रकार परिषदेसाठी आले, याची चर्चा ‘गोकूळ’ वर्तुळात जोरात सुरू होती.

दोन महिन्यांत दोन वेळा बदली

‘गोकूळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. एका अधिकाऱ्याची दोन महिन्यांपूर्वी ताराबाई पार्कातून दूध संकलन विभागात केली. तिथे स्थिरस्थावर होते न होते तोपर्यंत मुंबईला बदली केली. राजकीय द्वेषातून बदल्यांचे सत्र सुरू झाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

Web Title: From the consumer's pocket to the manufacturer's position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.