घराणेशाहीला विरोध असणारे आजी-माजी संपर्कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:23+5:302021-04-02T04:23:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून घराणेशाही सुरू आहे. आपल्या घरातीलच उमेदवार देऊन गोकुळ दूध संघ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सत्ताधारी आणि विरोधी गटाकडून घराणेशाही सुरू आहे. आपल्या घरातीलच उमेदवार देऊन गोकुळ दूध संघ आपल्या ताब्यात रहावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे घराणेशाहीला विरोध असणारे काही आजी-माजी आणि इच्छुक उमेदवार आपल्या संपर्कात असून, तिसरे निरपेक्ष पॅनेल उभे करण्यासाठी नियोजन सुरू आहे. त्याला सभासदही नक्कीच पाठबळ देतील, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडून घराणेशाही सुरू आहे. त्यामुळे काही विद्यमान, तर काही माजी संचालक नाराज आहेत. गोकुळ संघ सक्षमपणाने चालविण्यासाठी एक नवीन चेहरा सभासदांसमोर उभा करून तिसरे पॅनेल छाननीनंतर मूर्त स्वरुपात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेतेमंडळी संपर्कात असून, तिसरा पर्याय सक्षमपणे निवडणुकीला सामोरा जाऊन यश मिळवेल, असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला.
चौकट
राहुल आवाडे उमेदवार नाहीत
सत्ताधारी व विरोधी या दोन्ही गटांकडून घराणेशाहीला पाठबळ देत आपल्या वारसांना उमेदवारी देण्यासाठी खटाटोप करीत आहेत. त्यामुळे याला फाटा देण्यासाठी आम्ही राहुल आवाडे यांचा अर्ज भरला नाही. त्यामुळे ते या निवडणुकीत उमेदवार नाहीत.