इमारतीत पाच रुग्ण आढळ्यास कंटेनमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:25 AM2021-04-22T04:25:49+5:302021-04-22T04:25:49+5:30

ब्रेक दि चेन अंतर्गत आलेल्या या नव्या आदेशानुसार सोसायटीत एकापेक्षा जास्त इमारती असतील तर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेऊन ...

Containment zone if five patients are found in the building | इमारतीत पाच रुग्ण आढळ्यास कंटेनमेंट झोन

इमारतीत पाच रुग्ण आढळ्यास कंटेनमेंट झोन

Next

ब्रेक दि चेन अंतर्गत आलेल्या या नव्या आदेशानुसार सोसायटीत एकापेक्षा जास्त इमारती असतील तर स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेऊन कंटेन्मेंट झोनबद्दल निर्णय घेतला जाईल. कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांवर अधिक निर्बंध असतील तसेच अत्यावश्यक वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी नागरिकांना बाहेर जाता किंवा इमारतीत येता येणार नाही. त्याआधी त्यांची आरोग्य तपासणी केली जाईल. परिसरातून ये-जा करण्यासाठी वाहतुकीस परवानगी असणार नाही. सोशल डिस्टन्सिंग व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न झाल्यास १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.. त्यानंतरच्या पाच दिवसांत नवीन कोरोना रुग्ण आढळला नाही तर १० दिवसांनी हा परिसर कंटेनमेंट झोनमधून मुक्त करून सर्वसामान्य घोषित केला जाईल.

---

Web Title: Containment zone if five patients are found in the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.