मलकापूर पालिकेच्या अंदाजपत्रकात संभाजीराजेंचा अवमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:45 AM2021-02-28T04:45:29+5:302021-02-28T04:45:29+5:30

मलकापूर : मलकापूर नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात छत्रपती संभाजीराजेंविषयी चुकीची महिती छापणाऱ्या पालिकेच्या प्रशासन व सत्ताधारी नगरसेवकांना पालिकेच्या शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने जाब ...

Contempt of Sambhaji Raje in the budget of Malkapur Municipality | मलकापूर पालिकेच्या अंदाजपत्रकात संभाजीराजेंचा अवमान

मलकापूर पालिकेच्या अंदाजपत्रकात संभाजीराजेंचा अवमान

Next

मलकापूर : मलकापूर नगरपालिकेच्या अंदाजपत्रकात छत्रपती संभाजीराजेंविषयी चुकीची महिती छापणाऱ्या पालिकेच्या प्रशासन व सत्ताधारी नगरसेवकांना पालिकेच्या शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने जाब विचारून त्यांचा निषेध नोंदवून सभात्याग केला. पालिकेच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. पालिकेची विशेष अंदाजपत्रकीय सभा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल केसरकर होते.

पालिकेच्या अंदाजपत्रकाच्या प्रस्तावनेत छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी अवमानकारक मजकूर छापला कसा, असा प्रश्न विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील, गटनेत्या माया पाटील यांनी विचारला. जनसुराज्य-भाजपच्या सत्ताधारी गटाला याचे उत्तर देता आले नाही. नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी चुकीचा इतिहास लिहिणाऱ्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. तरीदेखील विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. विशेष सभेला प्रभारी मुख्याधिकारी अनुपस्थित होते. सत्ताधारी गटाने दोन तासाने परत सभा बोलावली. पालिकेचे २०२० ते २१ सालाचे ६ लाख ७५४ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर केले.

Web Title: Contempt of Sambhaji Raje in the budget of Malkapur Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.