‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:24+5:302021-03-13T04:45:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवा, असे आदेश शुक्रवारी ...

Continue the election process of ‘Gokul’ | ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा

‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवा, असे आदेश शुक्रवारी उच्च न्यायालयाने सहकारी निवडणूक प्राधिकरणास दिले. निवडणूक स्थगितीबाबत सत्तारूढ गटाने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘काेरोना’मुळे राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय २४ फेब्रुवारीला घेतला. मात्र, यामधून न्यायालयाने आदेश दिलेल्या संस्था वगळून असल्याने सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ‘गोकुळ’ची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवली. यावर सत्तारूढ गटाने हरकत घेत, राज्य शासनाच्या २४ फेब्रुवारीच्या आदेशालाच आव्हान दिले. यावर शुक्रवारी सुनावणी होऊन सत्तारूढ गटाची याचिका फेटाळत निवडणूक प्रक्रिया सुरूच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

दरम्यान, विरोधी जोतिर्लिंग दूध संस्था, केर्लीच्या वतीने गुरुवारी आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय निकाल देऊ नये, अशी स्वतंत्र याचिका दाखल केली होती.

उत्कंठा संपली

‘गोकुळ’ निवडणुकीची प्रक्रिया गेले वर्षभर सुरू आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू व स्थगितीमुळे दूध संस्थांमध्ये अस्वस्थता आहे. त्यात सत्तारूढ गटाने निवडणूक स्थगितीसाठी न्यायालयीन लढाई सुरू केल्याने गेला महिनाभर निवडणुकीबाबत कमालीची उत्कंठा होती, ती शुक्रवारी संपली.

राज्य शासन हस्तक्षेप करण्याची शक्यता

उच्च न्यायालयाने निवडणूक सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने सत्तारूढ गटापुढे पेच निर्माण झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता निवडणूक लांबणीवर टाकण्याची विनंती राज्य शासन करू शकते. त्यासाठी सत्तारूढ गटाने प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

Web Title: Continue the election process of ‘Gokul’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.