शिरोळमध्ये पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:48+5:302021-05-17T04:23:48+5:30
शिरोळमध्ये पावसाची संततधार * वाºयामुळे ऊसपिक भुईसपाट शिरोळ : वादळी वाऱ्यासह पावसाने रविवारी दिवसभर हजेरी लावली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा ...
शिरोळमध्ये पावसाची संततधार
* वाºयामुळे ऊसपिक भुईसपाट
शिरोळ : वादळी वाऱ्यासह पावसाने रविवारी दिवसभर हजेरी लावली. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचा उभा ऊस भुईसपाट झाला. दिवसभर जोरदार वारे वाहत होते. अधुनमधून वीजपुरवठादेखील खंडित झाला होता.
चक्रीय वादळामुळे मध्यरात्रीपासून जोरदार वारे वाहत होते. सकाळी ढगाळ वातावरण झाले होते. सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारनंतर सायंकाळपर्यंत संततधार सुरूच होती. जोरदार वाऱ्यामुळे ऊसपिकाला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ऊस पीक भुईसपाट झाला. लॉकडाऊन व पावसामुळे लोकांना बाहेर पडता आले नाही. पावसामुळे सायंकाळी दूध संकलनावर परिणाम झाला. तर वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंंडित झाला होता. या पावसामुळे वीटभट्ट्यांचे देखील नुकसान झाले.
फोटो - १६०५२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - शिरढोण (ता. शिरोळ) येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ऊस पीक भुईसपाट झाले होते.