चांदोली धरण क्षेत्रात पावसाची संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:54+5:302021-07-22T04:15:54+5:30
सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : चांदोली धरण क्षेत्रात कालपासून संततधार पावसाला सुरुवात झाली असून धरणात येणाऱ्या पाण्याची ...
सतीश नांगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
शित्तूर-वारूण : चांदोली धरण क्षेत्रात कालपासून संततधार पावसाला सुरुवात झाली असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे चांदोली धरण आज ७५.८७ टक्के भरले आहे.
३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणात सध्या १२२४२ क्यूसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. धरणात आज २६.१० टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणाची पाणीपातळी ६१७.६० मीटरवर पोहोचली आहे. सध्या धरणातून १११५ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.
सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमाक्षेत्रातील सर्व जनतेचे लक्ष लागून असलेले चांदोली धरण आता शंभर टक्के भरणार असल्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. संततधार पावसामुळे वारणा नदीची पाणीपातळीही वाढत आहे.
धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ६८ मिलिमीटर तर आजअखेर एकूण ८३३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे.
२१ चांदोली
फोटो :
चांदोली धरण सध्या ७५ टक्के भरले आहे. (छाया : सतीश नांगरे)