... म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी मागितली कोल्हापूरच्या जनतेची जाहीर माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:32 PM2021-06-18T16:32:39+5:302021-06-18T17:32:15+5:30

Hasan Mushrif Kolhapur : कोल्हापूरकरांना यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याने घालण्याचे वचन मी दिले होते, परंतु आणखी एक वर्ष काम पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला काळम्मावाडीचे पाणी देऊ शकणार नाही, याबद्दल कोल्हापूकरांची मी जाहीर माफी मागतो, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी मुश्रीफ कबुली दिली

Contractor errors with corona cause the pipeline to linger directly | ... म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी मागितली कोल्हापूरच्या जनतेची जाहीर माफी

... म्हणून मंत्री मुश्रीफ यांनी मागितली कोल्हापूरच्या जनतेची जाहीर माफी

Next
ठळक मुद्देथेट पाईपलाईन रेंगाळण्यास कोरोनासह ठेकेदाराच्या चुका कारणीभूतमंत्री मुश्रीफ यांची कबुली : कोल्हापूरच्या जनतेची जाहीर माफी मागतो

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याने घालण्याचे वचन मी दिले होते, परंतु आणखी एक वर्ष काम पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला काळम्मावाडीचे पाणी देऊ शकणार नाही, याबद्दल कोल्हापूकरांची मी जाहीर माफी मागतो, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी मुश्रीफ कबुली दिली

कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली थेट पाईपलाईन योजना तांत्रिक अडचणींसह कोरोनाचा कहर, वन विभागाकडून ना हरकत मिळण्यास झालेला विलंब आणि ठेकेदाराच्या चुकांमुळे रेंगाळली असल्याची कबुली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आता मात्र ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.



कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित योजनेचा आढावा घेण्याकरिता शुक्रवारी सकाळी मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांना त्याची माहिती दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, थेट पाईपलाईन योजना करण्याकरिता कोल्हापूरकरांनी दीर्घकाळ आंदोलन केले. केंद्र सरकारच्या यू.आय.डी.एस.एस.एम.टी. योजनेतून ४८८ कोटींच्या या योजनेला मंजुरी मिळाली. केंद्र सरकारने साठ टक्के, राज्य सरकारने वीस टक्के तर, महानगरपालिकेने वीस टक्के असा खर्चाचा भार उचलला आहे.

 

योजनेसाठी निधी उपलब्ध झाला. २७ डिसेंबर २०१३ रोजी योजनेला मान्यता मिळाली. परंतु वन विभागाच्या परवानगी मिळण्यास विलंब झाला. २०१९ मधील अतिवृष्टी, मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोनाचा कहर, काम करताना आलेल्या तांत्रिक अडचणी, ठेकेदारांच्या चुका अशा विविध कारणांनी हे काम रेंगाळले. त्यामुळे आणखी एक वर्ष हे काम चालणार आहे.

बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता (प्रकल्प) हर्षजित घाटगे यांच्यासह आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, राजेश लाटकर, आदिल फरास, शारंगधर देशमुख, संदीप कवाळे, सचिन पाटील उपस्थित होते.
 

Web Title: Contractor errors with corona cause the pipeline to linger directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.