कोरोना काळात आशावर्कर, अंगणवाडी सेविका यांचे योगदान समाजाभिमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:18 AM2021-06-05T04:18:26+5:302021-06-05T04:18:26+5:30

कसबा बीड (ता. करवीर) येथील ग्रामपंचायती तर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोना प्रोत्साहन ...

Contribution of Ashavarkar, Anganwadi Sevika during Corona period towards community | कोरोना काळात आशावर्कर, अंगणवाडी सेविका यांचे योगदान समाजाभिमुख

कोरोना काळात आशावर्कर, अंगणवाडी सेविका यांचे योगदान समाजाभिमुख

Next

कसबा बीड (ता. करवीर) येथील ग्रामपंचायती तर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर व ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोना प्रोत्साहन भत्ता वाटप आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सर्जेराव तिबिले होते.

यावेळी बोलताना कॉंग्रेस नेते शामराव सूर्यवंशी म्हणाले, कोरोना महामारीमध्ये ग्रामपंचायतीने योग्य नियोजन करून जनतेची सेवा केली हे कार्य अभिमानास्पद आहे.

ग्रामपंचायतीतर्फे अंगणवाडी सेविका, मदतनिस, ग्रामपंचायत कर्मचारी यांना दोन हजार रुपये प्रमाणे ५२ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर भत्ता रोख वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीतर्फे विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात गोकूळचे माजी संचालक व कॉंग्रेस नेते सत्यजित पाटील, सरपंच सर्जेराव तिबीले, दिनकर गावडे, दिनकर सूर्यवंशी, उपसरपंच वैशाली सूर्यवंशी, श्रीनिवास पाटी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक ग्रामविस्तार अधिकारी संदीप पाटील यांनी केले. शेवटी सरदार जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Contribution of Ashavarkar, Anganwadi Sevika during Corona period towards community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.