युवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान स्तुत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:29+5:302021-05-28T04:19:29+5:30
कणेरी : आरोग्य जनजागृतीसाठी फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्था,(एनजीओ) या संस्थेचे समाजकार्य महत्वपूर्ण आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्याचे ...
कणेरी :
आरोग्य जनजागृतीसाठी फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या युवा ग्रामीण विकास संस्था,(एनजीओ)
या संस्थेचे समाजकार्य महत्वपूर्ण आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्याचे योगदान
स्तुत्य आहे, असे प्रतिपादन गांधीनगरचे मुरली जेवरानी यांनी केले.
गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कामगारांना कोरोना संकटकाळात मोफत आरोग्य सेवेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे त्यांचेही कोरोनापासून संरक्षण व्हावे या हेतूने महेश जी. जेवरानी यांनी सामाजिक बांधिलकीतून युवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, पाणी बॉटल, बिस्कीट, केळी वाटप आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुनील पाटील होते.
याप्रसंगी प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे, ॲडमिन ऑफिसर सुनील पाटील, फ़ोटोग्राफर अनिल निगडे, प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते, मूल्यमापन व देखभाल अधिकारी अशोक बोगार्डे,समुपदेशक हेमंत सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे,कुणाल वाईगडे, प्रवीण पोवार, शिवम शेवाळे,अक्षय सांगलीकर,शिवप्रसाद पाटील,सामाजिक कार्यकर्ती दीपाली सातपुते आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : गोकुळ शिरगाव येथील युवा ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप प्रसंगी महेश जेवरानी, सुनील पाटील, अनिल निगडे,मोहन सातपुते आदी.