मुनिश्वरांकडून धोक्याने अंबाबाई मंदिराचा ताबा

By Admin | Published: July 4, 2017 01:13 AM2017-07-04T01:13:27+5:302017-07-04T01:13:27+5:30

मुनिश्वरांकडून धोक्याने अंबाबाई मंदिराचा ताबा

The control of the Ambabai temple by Munishwar | मुनिश्वरांकडून धोक्याने अंबाबाई मंदिराचा ताबा

मुनिश्वरांकडून धोक्याने अंबाबाई मंदिराचा ताबा

googlenewsNext

 लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर छत्रपती संभाजीराजे दुसरे यांनी अंबाबाई मंदिराच्या व्यवस्थापनेची जबाबदारी रामचंद्र भट प्रधान यांना दिली आणि त्यासाठी जमिनीही इनाम दिल्या. त्यांचे दत्तकनातू भालचंद्र प्रधान हे अज्ञान असल्याचा फायदा घेत मुनिश्वरांनी धोक्याने अंबाबाई मंदिराचा ताबा घेतला, अशी माहिती धर्मतत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ. देसाई यांनी शंभूराजे यांच्या काळातील तीन सनदा, मंदिराचे जाप्तेबुक या पुराव्यांनिशी माहिती दिली. ते म्हणाले, शंभूराजे छत्रपती यांची सन १८४६ च्या सनद क्रमांक ९४७ अनुक्रमांक ८६ नुसार नरहरी भट-सांगावकर तसेच शिदोजी हिंदुराव घोरपडे यांना ‘श्रीं’च्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेसंबंधीची सनद दिली होती. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी गावेही इनाम दिली. या सनदांवर ‘वहिवाटदार’ म्हणून ‘रामचंद्र भट प्रधान’ यांचा उल्लेख आहे. त्यांचा मुलगा श्रीपाद सखाराम प्रधान यांना मूल नव्हते म्हणून त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी भाचीचा मुलगा भालचंद्र याला सन १९५४ मध्ये दत्तक घेतले. त्यावेळी भालचंद्र हे केवळ सात वर्षांचे होते. दत्तक विधानानंतर पंधरा दिवसांतच प्रधान वारले आणि भालचंद्र प्रधान अज्ञान असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून मंदिराचे व्यवस्थापन सुरू होते. या सगळ््यांचा फायदा घेत मुनिश्वरांनी आपल्याला सोयीस्कर असा निकाल लावून घेतला. भालचंद्र प्रधान सज्ञान झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पूजेचे अधिकार मागितले. मात्र, मुनिश्वरांनी त्यांना दाद लागू दिली नाही. अनेक वर्षे न्यायालयात जाऊनही दाद मिळेना आणि आर्थिक परिस्थितीदेखील बिकट झाल्याने त्यांनी या विषयाचा नादच सोडला. भालचंद्र प्रधान वयोवृद्ध आहेत.
शंभूराजेंच्या काळातही मंदिरातील संपत्तीची रोजनिशी लिहिली जात होती. सन १८६६ च्या श्री करवीरनिवासिनीच्या जाप्तेबुकमध्ये मंदिरात देवीला अर्पण होणाऱ्या साड्या, खण, नारळ, अलंकार या सगळ्यांची नोंद केली जात होती. या नोंदी रामचंद्र भट प्रधान हे सहीनिशी हुजूर सरकारला सादर करत होते. ही संपत्ती त्याकाळीही सरकारच्या खजिन्यात जमा होत होती.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, सद्य:स्थितीत अंबाबाई मंदिरात किती पुजारी आहेत, त्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांकासहित माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावी.
विजय देवणे म्हणाले, संघर्ष समितीतर्फे महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, पंचायत समिती अशा ठिकाणी निवेदन देऊन अंबाबाई मंदिरातून पुजारी हटविण्यासंबंधीचे ठराव करावेत, तसेच आमदार व खासदारांनी आपआपल्या सभागृहांत हा प्रश्न उपस्थित करावा.
वसंतराव मुळीक म्हणाले, मंदिरातील पुजाऱ्यांची कुठेच नोंद नाही, त्यांच्याकडून मदतनीस म्हणून कोणत्याही माणसाला गाभाऱ्यात नेले जाते, हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे.
‘करवीर निवासिनी’
आणि ‘अंबाबाई’चा उल्लेख
देसाई म्हणाले, भालचंद्र प्रधान यांना मी दोन दिवसांपूर्वी भेटून आलो. त्यांनीदेखील या देवीचे स्वरूप दुर्गेचे असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्या काळापासून देण्यात आलेल्या सनदांमध्ये देवीचा उल्लेख ‘करवीर निवासिनी’ असा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दि. ८ नोव्हेंबर १९४९ व दि. १४ जानेवारी १९५० मध्ये दिलेल्या पत्रांमध्ये मात्र ‘श्री अंबाबाई टेंपल’ असा उल्लेख आहे. त्यातसुद्धा ‘वहिवाटदार’ म्हणून प्रधान यांचाच उल्लेख आहे.
उद्या पुरावे सादर करणार
देवणे म्हणाले, तमिळनाडू, पंजाब, नेपाळमधील मंदिरातून खासगी पुजाऱ्यांना हटवून ‘सरकारी पुजारी’ नेमण्यात आले आहेत. कोल्हापुरातील जनरेटा म्हणून शासनाने हा निर्णय घ्यावा, यासाठी सर्व धार्मिक व ऐतिहासिक पुरावे उद्या, बुधवारी सादर करणार आहोत. देसाई म्हणाले, हा निर्णय होईपर्यंत शासनाने आपल्या अधिकारात पुजारी हटवून मंदिरातील सर्व उत्पन्न न्यायालयीन कस्टडीत द्यावे.

Web Title: The control of the Ambabai temple by Munishwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.