कोरोना चाचण्यांचे भरमसाट दर नियंत्रित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:19 AM2021-05-28T04:19:23+5:302021-05-28T04:19:23+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा गंभीर ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा गंभीर प्रसंगी शहरातील अनेक डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅबमध्ये विविध चाचण्यांसाठी मनमानी पद्धतीने पैशांची आकारणी केली जात आहे. हे दर नियंत्रित करा, अशी मागणी भाजपच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोल्हापूर भाजपच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना ई मेलद्वारे गुरुवारी हे निवेदन पाठविण्यात आले. सर्व चाचण्यांसाठी येणारा खर्च अधिक २० टक्के नफा असे सूत्र लक्षात घेता कोल्हापूर शहरातील विविध डायग्नोस्टिक सेंटर, पॅथॉलॉजी लॅब सेंटरच्या व्यवस्थापकांची संयुक्त बैठक घेऊन सेंटरमध्ये होणाऱ्या कोरोना चाचण्यांची भरमसाट फी आकारणी नियंत्रित करण्यात यावी व ती सर्वत्र सारखीच असावी, अशी मागणी करण्यात आली आहे. देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई यांच्यावतीने हे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले.