नियंत्रक रंजना पाटील निलंबित

By Admin | Published: January 5, 2015 12:22 AM2015-01-05T00:22:25+5:302015-01-05T00:42:02+5:30

‘विद्यार्थी पास’ गैरव्यवहार : रंकाळा स्टँड येथील प्रकार; प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न

Controller Ranjana Patil suspended | नियंत्रक रंजना पाटील निलंबित

नियंत्रक रंजना पाटील निलंबित

googlenewsNext

कोल्हापूर : रंकाळा स्टँड येथील ‘विद्यार्थी पास’मध्ये झालेल्या गैरव्यवहाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. या प्रकरणात राधानगरी तालुक्यातील एका तरुणाचा सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. गैरव्यवहारप्रकरणी रंकाळा एस. टी. स्टँडमध्ये वाहतूक नियंत्रक रंजना कृष्णात पाटील (रा. येळवडे ता. राधानगरी) यांना एस. टी. महामंडळाने निलंबित केले आहे.
रंकाळा स्टँड येथे वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांच्याकडे विद्यार्थी व कामगार पास देण्याचे काम होते. येथून दर महिन्याला रंकाळा स्टँड येथून ३ हजार ५०० विद्यार्थी पासचा लाभ घेत आहेत. या ठिकाणी कामगारांना ठरावीक रक्कम घेऊन ‘विद्यार्थी पास’ दिले जात होते. हा प्रकार गेल्या वर्षापासून सुरू होता. रंजना पाटील यांच्या कारनाम्याची कुणकुण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली होती. त्यांनी त्या दिशेने तपास सुरू केल्यानंतर पाटील यांचे बिंंग फुटले. काही नोकरदार ‘विद्यार्थी पास’ घेऊन प्रवास करताना आढळले. त्यामुळे त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हे पास रंकाळा स्टँड येथील वाहतूक नियंत्रकांनी दिल्याचे सांगितल्याचे समजते. यासंबंधी अहवाल वरिष्ठांच्याकडे दिला असता त्यांनी तत्काळ वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांना निलंबित केले. प्रशासनाने याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. या प्रकरणात केवळ राधानगरी तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. पाटील यांना तालुक्यातील एक तरुण मदत करत असल्याची चर्र्चा आहे. त्यामुळे राधानगरी तालुक्यातील एक वजनदार नेता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा एस.टी.च्या वर्तुळात सुरू आहे.


परिसरातीलच व्यक्तीला पास
विभागीय वाहतूक नियंत्रक पाटील यांनी आपल्या राधानगरी परिसरात राहणाऱ्या नोकरदारांनाच हेच पास दिल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे, असे समजते. वाहतूक नियंत्रक पाटील या प्रकरणात फक्त एकट्याच आहेत की त्यांना या प्रकरणी आणि कोणी मदत करत होते. याचा तपास होणेही गरजेचा आहे.


असा आला प्रकार उघडकीस
रंकाळा स्टँड येथे काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पाससाठी अर्ज केला होता. मात्र, येथील वाहतूक नियंत्रक पाटील यांनी त्यांना पास संपलेत, असे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची तक्रार विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे केली. त्यांनी सखोल तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला.


याबाबत प्राथमिक माहितीनुसार ‘विद्यार्थी पास’मध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिसते. त्यामुळे रंकाळा स्टँड येथील वाहतूक नियंत्रक रंजना पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पारदर्शकपणे तपास सुरू असून याबाबत चार दिवसांत अहवाल प्राप्त होऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल
- सुहास जाधव (विभाग नियंत्रक)

Web Title: Controller Ranjana Patil suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.