बेळगाव येथे ३६०६ एअरमन्सचा दीक्षांता समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:23 AM2021-08-01T04:23:59+5:302021-08-01T04:23:59+5:30
एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या परेड ग्राऊंडवर झालेल्या सोहळ्यास बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलचे कमांडिंग ऑफिसर एअर कमोडोर एस. डी. मुकुल ...
एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या परेड ग्राऊंडवर झालेल्या सोहळ्यास बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलचे कमांडिंग ऑफिसर एअर कमोडोर एस. डी. मुकुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी प्रशिक्षणार्थी एअरमन्सनी शानदार संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रमुख पाहुणे एअर कमोडोर मुकुल यांनी परेडची पाहणी केल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या एअरमन्सना पारितोषिक देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी बोलताना एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांनी हवाई दलाच्या क्रियात्मक वातावरणात सर्वांनी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे सांगून व्यावसायिक कौशल्याच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.
दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थी एअरमन बालाजी एम. याची बेस्ट इन जनरल सर्व्हिस, सुरेंद्र कुमार यांची बेस्ट इन अकॅडमी, मनीष चौरसिया याची बेस्ट मार्क्स मन आणि कुलदीप यांची ओव्हर ऑल फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरीट या पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सोहळ्यास निमंत्रितांसह भारतीय हवाई दलाचे अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी एअरमन्सचे नातेवाईक उपस्थित होते. दीक्षांत सोहळ्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले ३,६०६ एअरमन्स भारतीय हवाई दलाच्या विविध विभागात देशसेवा बजावण्यासाठी रवाना झाले आहेत.
३१ बेळगाव सांबरा परेड
फोटो: सांबरा येथे वायुसेना दलातील एअरमन ट्रेनिंग सेंटरमधील पासिंग आऊट परेडची दृश्ये.