अखेर ठरलं! शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 'या' दिवशी होणार

By संदीप आडनाईक | Published: March 17, 2023 06:11 PM2023-03-17T18:11:45+5:302023-03-17T18:49:34+5:30

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यामुळे आणि शिक्षकेतर संघटनेच्या संपामुळे दीक्षांत समारंभ लांबणीवर

Convocation ceremony of Shivaji University on March 29 | अखेर ठरलं! शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 'या' दिवशी होणार

अखेर ठरलं! शिवाजी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 'या' दिवशी होणार

googlenewsNext

कोल्हापूर : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यामुळे आणि शिक्षकेतर संघटनेच्या संपामुळे लांबणीवर पडलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला कुलपती कार्यालयाने हिरवा झेंडा दाखविला. नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली हा ५९ वा दीक्षांत समारंभ सोहळा २९ मार्चला होणार आहे. यासंदर्भातील पत्रव्यवहाराला कुलपती कार्यालयांकडून मंजुरी मिळाली असून तसे पत्र विद्यापीठ प्रशासनाला मिळालेले आहे.

विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १६ फेब्रुवारीला होणार होता. यासाठी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. हेच पाहुणे २९ मार्च रोजीच्या दीक्षांत समारंभासाठी उपस्थित असतील.

विद्यापीठातील ६६ हजार ४५७ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या प्रमाणपत्रांची छपाईही पूर्ण झाली होती. नवे राज्यपाल रमेश बैस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दीक्षांत समारंभाची नवी तारीख मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने कुलपती कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. शिवाजी विद्यापीठात आता या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकांची छपाई, कार्यक्रमाची रूपरेषा आणि ग्रंथमहोत्सवाची तयारी याची कामे सुरू झाली आहेत. दीक्षांत समारंभासाठी घालण्यात आलेला मंडप अद्यापही काढलेला नाही. याशिवाय रस्ता दुरुस्तीचेही काम पूर्ण झाले आहे.

Web Title: Convocation ceremony of Shivaji University on March 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.