कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:21 AM2021-04-19T04:21:14+5:302021-04-19T04:21:14+5:30
गडहिंग्लज : कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी शासनाने घातलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य ...
गडहिंग्लज :
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी शासनाने घातलेल्या नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले.
येथील शिवराज महाविद्यालयात 'ब्रेक द चेन' या कोरोना जनजागृतीविषयी आयोजित ऑनलाइन राष्ट्रीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
पांगारकर म्हणाल्या, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र भयावह स्थिती आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन साथीवर आळा घालणे गरजेचे आहे. नागरिकांनीही लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप आंबोळे म्हणाले, आतापर्यंत अर्धा तालुका बाधित झाला आहे. मला काही झाले नाही असे समजून फिरणाऱ्या सुपर स्प्रेडरमुळेच तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडणे मुश्कील बनले आहे.
मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनीही मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव प्रा. अनिल कुराडे यांनी स्वागत केले.
प्राचार्य डॉ. एस.एम. कदम, डॉ. एस.डी. पाटील, संतोष कुरबेट्टी, विक्रम शिंदे, प्रसाद गोयल, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर, ग्रंथपाल संदीप कुराडे, उमेश कानडे, रणजीत कांबळे, अक्षय पाटील, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
-----------------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन कार्यशाळेत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, डॉ. दिलीप आंबोळे, अनिल कुराडे, एस.एम. कदम आदी उपस्थित होते.
क्रमांक : १८०४२०२१-गड-०३