राजारामपुरीतील तीन मंडळांवर गुन्हे दाखल, मिक्सर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 05:55 PM2017-08-26T17:55:42+5:302017-08-26T17:59:30+5:30

कोल्हापूर : शहरातील संवेदनशील राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणुक काढण्याचा प्रयत्न करणाºया एकता तरुण मंडळ प्रणित महाडीक ग्रुपचा अध्यक्ष रहिम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉईज आदी मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलीसांनी गुन्हे दाखल करुन मिक्सर जप्त केले.

Cops booked in three boards in Rajarampur, seized the mixer | राजारामपुरीतील तीन मंडळांवर गुन्हे दाखल, मिक्सर जप्त

राजारामपुरीतील तीन मंडळांवर गुन्हे दाखल, मिक्सर जप्त

Next
ठळक मुद्देमहाडीक ग्रुपच्या रहिम सनदीसह पंधरा कार्यकर्त्यांचा समावेशनियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणुक काढण्याचा प्रयत्न मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलीसांनी गुन्हे दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात सादर केले जाणार

कोल्हापूर : शहरातील संवेदनशील राजारामपुरीत गणेश आगमनादिवशी नियमबाह्य डॉल्बी लावून मिरवणुक काढण्याचा प्रयत्न करणाºया एकता तरुण मंडळ प्रणित महाडीक ग्रुपचा अध्यक्ष रहिम सनदी याच्यासह राजारामपुरी तालीम मंडळ, व्ही बॉईज आदी मंडळांच्या पंधरा कार्यकर्त्यांवर राजारामपुरी पोलीसांनी गुन्हे दाखल करुन मिक्सर जप्त केले.

संबंधित मंडळांवर कठोर कारवाईसाठी मिरवणुकीचे व्हिडीओ चित्रिकरण, वृत्तपत्रांतील बातम्या, छायाचित्रे यांचा आधार घेत, तसेच सरकारी पंचांची साक्ष घेऊन गुन्ह्यांचे दोषारोपपत्र लवकरच न्यायालयात सादर केले जाणार आहे. अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांच्या बैठक घेऊन, नियम डावलून डॉल्बी लावणाºया तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलिस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला तशी लेखी नोटीसही बजाविली होती. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली होती. तसेच डॉल्बी लावल्याने मानवी आरोग्यावर होणाºया विपरित परिणामांचे प्रबोधनही केले होते. परंतु, राजारामपुरीत गणेश आगमनादिवशीच काही मंडळांनी डॉल्बीमुक्त उत्सवाचे पोलिसांचे आदेश धुडकावून डॉल्बी लावून ध्वनिप्रदूषण केले. जनता बझार ते हनुमान मंदिर या मार्गांवर मिरवणूक रेंगाळून रहदारीस अडथळा निर्माण झाला, या मिरवणुकीचे पोलिसांनी व्हिडिओ चित्रिकरण केले. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही ध्वनिक्षेपक मापन यंत्राद्वारे डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा तपासली. यामध्ये एकता तरुण मंडळ, राजारामपुरी तालीम मंडळ (आर. टी. एम) व्ही बॉईज या मंडळांनी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या तिन्ही मंडळावर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. डॉल्बीविरोधात गुन्हे दाखल झालेल्या मंडळांच्या पदाधिकाºयांना पारपत्र, शासकीय, निमशासकीय नोकरीमध्ये हजर होताना अडचणी निर्माण होऊन त्यांच्या भवितव्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे डॉल्बीचा हट्ट कोणी धरु नये, गणेशभक्तांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यांच्यावर झाले गुन्हे दाखल

एकता तरुण मंडळ प्रणित महाडीक ग्रुप
संस्थापक अध्यक्ष रहिम सनदी, अमित पवार, अस्लम बाबुभाई बागवान (रा. गंजीमाळ, सोमवारपेठ), निलेश सुधीर कोळेकर , अमित मोहन कोंडेकर, अतुल हरी कोंडेकर (सर्व. रा. राजारामपूरी ३ गल्ली)

राजारामपूरी तालीम मंडळ
विशाल विजय जाधव, अध्यक्ष ओंकार विजय यादव, उपाध्यक्ष निलेश अनिल व्हरांबळे, प्रज्वल दिनेश देवगीरकर (रा. दत्त गल्ली, शाहूनगर), सिध्देश सुनिल जाधव (रा. माने कॉलनी सम्राटनगर (राजारामपूरी तालीम मंडळ),

चॅलेंज ग्रुप (व्ही बॉईज)
रोहित पवार, समरजितसिंह सुनिल धनवडे, सलीम अब्दुल मणेर, सिध्दांत श्रीकांत पालकर, सौरभ लक्ष्मण कुºहाडे (सर्व रा. राजारामपूरी १३ वी गल्ली).

मंडळांचे आभार
गणेश आगमनादिवशी डॉल्बीला फाटा देत पारंपारीक वाद्यांचा वापर करुन स्वागत मिरवणुक शांततेत पार पाडली. अशा सर्व मंडळांचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी आभार मानले आहेत. येथून पुढे मंडळांनी पोलीसांना असेल सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
----------------------

Web Title: Cops booked in three boards in Rajarampur, seized the mixer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.