जिल्ह्यात १६४० जणांना कोराेनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:07+5:302021-07-10T04:18:07+5:30

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात चोवीस तासांत १६४० जणांना कोरोनाची लागण झाली. एकूण २९ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू ...

Corainea affected 1640 people in the district | जिल्ह्यात १६४० जणांना कोराेनाची बाधा

जिल्ह्यात १६४० जणांना कोराेनाची बाधा

Next

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात चोवीस तासांत १६४० जणांना कोरोनाची लागण झाली. एकूण २९ जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू कोल्हापूर शहरात झाले आहेत. १३९७ जणांनी कोरोनावर मात केली. गडहिंग्लज तालुक्यात बाधितापेक्षा मृत्यूचा आकडा जास्त आहे.

कोरोना रुग्णांची संख्या अलीकडे पंधराशेवरच आहे. मृत्यूचा आकडाही दोन अंकी कायम आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा व्यापकपणे तपासणीची मोहीम राबवत आहे. यामुळे पहिल्या टप्प्यातच बाधित रुग्ण समोर येत आहेत. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. सध्या सीपीआरसह सर्वच खासगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर बेड फुल आहेत. सीपीआरमध्ये सध्या ४५० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण १३ हजार ७८० रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येतही घट झालेली नाही. अनेक गावे आणि शहरातील प्रभाग हॉटस्पॉट बनले आहेत. मयत २९ पैकी ८ जण दीर्घकालीन आजारी होते. १९ जण ६० वर्षांवरील होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ४८ तासांच्या आत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.१८ टक्के आहे.

चौकट

कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या गावांची नावे अशी : कोल्हापूर शहर : रविवारपेठ, राजारामपुरी, सदर बझार, फुलेवाडी रिंगरोड, महाडिक कॉलनी, शिवाजी पेठ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर दोन, सायबर चौक.

हातकणंगले : मौजे वडगाव, रांगोळी, वडगाव, हुपरी

कागल : खडकेवाडी

शिरोळ : टाकवडे, संभाजीपूर

करवीर : सांगवडे, आमशी, वरणगे पाडळी, शिंगणापूर

चंदगड : शिवणगे

गडहिंग्लज : मुगळी दोन, गडहिंग्लज,

शाहूवाडी : पणुंद्रे

Web Title: Corainea affected 1640 people in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.