महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी कोराेना प्रतिबंधात्मक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:07+5:302021-06-10T04:17:07+5:30
कोल्हापूर : महापालिकेतर्फे शहरातील दिव्यांगांना दोन टप्प्यांत कोरोना प्रतिबंधात्मक लस सुलभपणे देण्याचे नियोजन केले आहे. जे दिव्यांग लसीकरण ...
कोल्हापूर : महापालिकेतर्फे शहरातील दिव्यांगांना दोन टप्प्यांत कोरोना प्रतिबंधात्मक लस सुलभपणे देण्याचे नियोजन केले आहे.
जे दिव्यांग लसीकरण केंद्रापर्यंत येऊ शकतात, अशांनी उद्या, शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत शहरातील ११ मनपा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर उपस्थित राहावे. तेथे त्यांच्यासाठी लसीकरणाचे वेगळे नियोजन केले आहे.
दुसऱ्या टप्प्यात जे दिव्यांग केंद्रावर येऊ शकत नाही, अशांसाठी विशेष लसीकरण मोहीम पुढील आठवड्यात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत लस घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांगांनी ९६०४३६४६५२, ९९६०१५१००८, ७०२०३६९३६० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून नाव नोंदणी करावी. दरम्यान, महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व दिव्यांगांनी पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी अपंगत्व दाखला, आधार कार्ड घेऊन आपल्या नजीकच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.