कॉर्नवॉलीस मॅसोनिकतर्फे अंध, अपंग व किन्नरांना धान्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:18 AM2021-06-28T04:18:34+5:302021-06-28T04:18:34+5:30

कोल्हापूर : येथील कॉर्नवॉलीस मॅसोनिक लॉजतर्फे शहरातील अंध, अपंग व किन्नरांच्या कुटुंबीयांसाठी एक महिना पुरेल इतके धान्य, किराणा, तेल ...

Cornwallis Masonic distributes food to the blind, disabled and the deaf | कॉर्नवॉलीस मॅसोनिकतर्फे अंध, अपंग व किन्नरांना धान्य वाटप

कॉर्नवॉलीस मॅसोनिकतर्फे अंध, अपंग व किन्नरांना धान्य वाटप

Next

कोल्हापूर : येथील कॉर्नवॉलीस मॅसोनिक लॉजतर्फे शहरातील अंध, अपंग व किन्नरांच्या कुटुंबीयांसाठी एक महिना पुरेल इतके धान्य, किराणा, तेल असे सर्व साहित्य असलेल्या ५० किट्सचे वाटप करण्यात आले. मॅसोनिक लॉजच्या शाखा संपूर्ण जगभर असून, लॉजचे सदस्य बंधुभाव टिकविणे व उपेक्षितांचे मदत करण्यासाठी सक्रिय असतात.

लॉजतर्फे जून महिना ‘जागतिक बंधुत्व महिना म्हणून साजरा केला जातो. लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये अंध, अपंग व किन्नर या सर्व घटकांची होत असलेली उपासमार पाहून लॉजतर्फे मदत देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे मिलिंद धोंड यांनी सांगितले. याप्रसंगी सूर्यकांत पाटील (बुदिहाळकर), अमरदीप पाटील, वासुदेव कलघटगी उपस्थित होते.

फोटो : २७०६२०२१-कोल- मदत वाटप

कोल्हापुरातील कॉर्नवॉलीस मॅसोनिक लॉजतर्फे शहरातील अंध, अपंग व किन्नरांच्या कुटुंबीयांसाठी एक महिना पुरेल इतके धान्य, किराणा, तेल असे सर्व साहित्य असलेल्या ५० किट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी सूर्यकांत पाटील (बुदिहाळकर), अमरदीप पाटील, वासुदेव कलघटगी उपस्थित होते.

Web Title: Cornwallis Masonic distributes food to the blind, disabled and the deaf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.