दुसरा डोस घेतलेल्या १३६८ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:18 AM2021-07-18T04:18:39+5:302021-07-18T04:18:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतलेल्या १३६९ जणांना कोरोनाची ...

Corona to 1368 people who took the second dose | दुसरा डोस घेतलेल्या १३६८ जणांना कोरोना

दुसरा डोस घेतलेल्या १३६८ जणांना कोरोना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतलेल्या १३६९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, पहिला डोस घेतल्यानंतरही २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासन, आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, खासगी रुग्णालये यांनी युद्धपातळीवर दुसरा डोससाठी पात्र नागरिकांचे लसीकरण करून घेण्याची गरज आहे.

कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी केवळ आणि केवळ लसीकरण गरजेचे असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. परंतु, मधल्या दोन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यावर लसीच्या बाबतीत अन्याय सुरू झाल्याने लसीकरणाची टक्केवारी फारच खाली आली होती. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून आता लसींची मात्रा वाढविण्यात आली आहे.

शनिवारअखेर बाराही तालुक्यांसह महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १५ लाख १५ हजार ३५७ नागरिकांना लस देण्यात आली आहे. यापैकी पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या ७ हजार ११३ इतकी आहे. यातील ५ हजार ७४५ जण पाहिला डोस घेतल्यानंतर बाधित झाले असून, यापैकी २७८७ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत, तर २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरा डोस दिल्यानंतरही १३६८ जणांना काेरोनाची लागण झाली आहे. यातील ६९४ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. मात्र, यातील एकाचाही मृत्यू झालेला नाही हे दिलासादायक आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

चौकट -

अ. न. तालुका पहिला, दुसरा डोस घेतल्यानंतर बाधित झालेले मृत्यू

१ आजरा १५१ १५

२ भुदरगड २९२ ०६

३ चंदगड ५२३ १८

४ गडहिंग्लज ५७३ ०३

५ गगनबावडा ९६ ०२

६ हातकणंगले १७३० ५४

७ करवीर ४४७ ०७

८ कागल २८० १२

९पन्हाळा २७८ ०७

१० राधानगरी ४५८ ३१

११ शाहूवाडी ६९० २५

१२ शिरोळ १५२२ ३९

१३ नगरपालिका क्षेत्र ७३ ००

१४ महानगरपालिका ०० ००

१५ इतर राज्यातील ०० ००

टक्के ०.४७ टक्के ०.०१४ टक्के

चौकट

सर्वाधिक मृत्यू हातकणंगले तालुक्यातील

पहिला डोस घेतल्यानंतर मृत्यू पावणाऱ्यांची सर्वाधिक संख्या ही हातकणंगले तालुक्यातील आहे. या तालुक्यात अशा ५४ जणांचा मृत्यू झला आहे, तर त्याखालोखाल शिरोळ तालुक्यातील ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर राधानगरी तालुक्यातील ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Corona to 1368 people who took the second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.