बिंदू चौक उपकारागृहात ३१ कैद्यांना कोरोना; कारागृह प्रशासनाची तारंबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 02:04 PM2021-04-11T14:04:28+5:302021-04-11T14:05:12+5:30

Coronavirus in Maharashtra : कोरोनाची बाधा झालेल्या सर्व कैद्यांना प्रशासनाने तातडीने येथील केअर सेंटरमध्ये अलगीकरण उपचार सुरू केले. 

Corona 31 prisoners in Bindu Chowk jail; The cable of prison administration | बिंदू चौक उपकारागृहात ३१ कैद्यांना कोरोना; कारागृह प्रशासनाची तारंबळ

बिंदू चौक उपकारागृहात ३१ कैद्यांना कोरोना; कारागृह प्रशासनाची तारंबळ

googlenewsNext
ठळक मुद्देबिंदू चौक उपकाराग्रहात सुमारे २०० हून अधिक कच्चे बंदी आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन गतवर्षीच नव्याने दाखल होणारे कच्चे कैदी आयटीआय येथील तात्पुरत्या कारागृहात दाखल करण्यात येत होते.

कोल्हापूर : येथील र्बिंदू चौक उपकाराग्रहातील ३१ कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. यामुळे कारागृह प्रशासनाची झोप उडाली. कोरोनाची बाधा झालेल्या सर्व कैद्यांना प्रशासनाने तातडीने येथील केअर सेंटरमध्ये अलगीकरण उपचार सुरू केले. 

बिंदू चौक उपकाराग्रहात सुमारे २०० हून अधिक कच्चे बंदी आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन गतवर्षीच नव्याने दाखल होणारे कच्चे कैदी आयटीआय येथील तात्पुरत्या कारागृहात दाखल करण्यात येत होते. येथे अलगीकरणाचा कालावधीनंतर तपासणीअंती त्यांना बिंदू चौक उपकारागृहात ठेवण्यात येत होते. गेल्या तीन महिन्यात कोरोनाचा कहर काही अंशी ओसरल्यानंतर ही प्रक्रिया बंद झाली. आता कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी शासानाने वीकेंड लॉकडाऊन लागू केला. दरम्यान, उपकारागृहातील एका कैद्याला इचलकरंजी येथे तपासकामासाठी नेले होते. त्यावेळी त्याची प्रक्रुती बिघडली, त्याची कोरोना चाचणीत पॉझीटीव्ह आली होती. त्यानंतर काराग्रह प्रशासन हबकले. दक्षतेचा भाग म्हणून प्रशासनाने बिंदू चौक उपकारागृह त्याच्या संपर्कातील ८२ कैद्यांची गुरूवारी (दि.८) महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रूग्णालयात येथे चाचणी केली. त्यांचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला.त्यात ३१ कैद्यांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आला. तसे प्रशासनाची तारंबळ उडाली. संबधितांना तातडीने अलगीकरण करण्यात आले, त्यांच्यावर औषध उपचार सुरू केले. 

उपकाराग्रहात कैदी
पुरूष कैदी - १९९
महिला केदी - १० 
कर्मचारी संख्या- ३१


बिंदू चौक उपकाराग्रहातील कच्चे कैदयांचे अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आलेत. त्यांची प्रकृती स्थीर आहे. त्यांच्यावर सर्व औषधोपचार सुरू आहेत. इतरही कैद्यांची तपासणी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. - विवेक झेंडे, अधीक्षक, बिंदू चौक उपकाराग्रह, कोल्हापूर

Web Title: Corona 31 prisoners in Bindu Chowk jail; The cable of prison administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.