कोरोना पार्श्वभूमीवर समूह अध्यापनासाठी योग्य मार्गदर्शन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:16 AM2021-06-30T04:16:16+5:302021-06-30T04:16:16+5:30
निवेदनात लवकरात लवकर शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देता यावे, अशी सर्व शिक्षकांची धारणा आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ...
निवेदनात लवकरात लवकर शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देता यावे, अशी सर्व शिक्षकांची धारणा आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासनाने शाळेत विद्यार्थी बोलावणेस अद्यापही पवानगी दिलेली नाही. तथापि १४ जून रोजीच्या पत्रानुसार शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांनी दररोज पन्नास टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन व इतर माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण सुरळीतपणे सुरू राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिलेले असून, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणेसंदर्भात कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. असे असताना २८ जून रोजी शाहूवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेत मुलांना बोलावून समूह अध्यापनबाबत लेखी सूचना दिलेल्या आहेत.
तेरा जूनच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे पत्रात शक्य आहे तेथे समूह अध्यापन घेण्याबाबत सूचना आहेत. मात्र, समूह अध्यापनासाठी जास्तीत जास्त किती विद्यार्थी असावेत व समूह अध्यापन कोठे करावे, याबाबत मार्गदर्शन नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षक अद्यापही कोरोना संदर्भातील कामकाजामध्ये कार्यरत आहेत.
तरी आपल्या जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता मुलांना शाळेत बोलावून शिक्षण सुरू करणे हे योग्य असल्यास आपल्या जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील अध्यापनात सुसूत्रता राहावी, यासाठी सर्वच शाळांना जिल्हा प्रशासनाकडून योग्य त्या मार्गदर्शक सूचना मिळाव्यात, अशी विनंती संघटनेने केली आहे.
निवेदनावर राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य संघटक पी. आर. पाटील, काशिराम बिरूनगी, गोविंद पाटील, एस. के. पाटील, शंकर पवार, विद्या कदम, शारदा वाडकर, प्रेरणा चौगुले, सुनील पोवार, अशोक शिवणे आदींच्या सह्या आहेत.
फोटो ओळी-
समूह अध्यापनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना देताना पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, पी. आर. पाटील आदी.