corona in belgaon : सलग दुसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील बाधितांच्या आकडा 108 वर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:54 PM2020-05-16T17:54:37+5:302020-05-16T17:55:42+5:30

बेळगाव जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 108 इतकी स्थिर आहे.

corona in belgaon: For the second day in a row, the number of victims in Belgaum district has stabilized at 108 | corona in belgaon : सलग दुसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील बाधितांच्या आकडा 108 वर स्थिर

corona in belgaon : सलग दुसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील बाधितांच्या आकडा 108 वर स्थिर

Next
ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्यातील बाधितांच्या आकडा 108 वर स्थिरजिल्ह्यातील 55 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

बेळगाव  : जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नव्याने एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 108 इतकी स्थिर आहे.

शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली नसल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य खात्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याबाहेरील बागलकोट येथील कोरोनाग्रस्तांची संख्या देखील 8 अशी स्थिर आहे.

उपचारांची पूर्ण पर्यंत बरे झालेले असल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 55 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांपैकी एकाचा मृत्यू झाला असून अन्य एकाला पुनर्रउचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, परराज्यातील एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या आपल्या राज्यात प्रवेश केला असेल तर नागरिकांनी त्याची माहिती तात्काळ कंट्रोल रूमला (दूरध्वनी क्र. 0831-2407290) किंवा नजीकच्या पोलीस स्थानकात द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: corona in belgaon: For the second day in a row, the number of victims in Belgaum district has stabilized at 108

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.