corona cases in kolhapur : दुसऱ्या लाटेत जि.प.चे ७६ कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 10:52 AM2021-05-29T10:52:03+5:302021-05-29T10:53:23+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या ७६ कर्मचारी बाधित झाले आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाच्या ...

Corona cases in Kolhapur: 76 employees of ZP affected in second wave | corona cases in kolhapur : दुसऱ्या लाटेत जि.प.चे ७६ कर्मचारी बाधित

corona cases in kolhapur : दुसऱ्या लाटेत जि.प.चे ७६ कर्मचारी बाधित

Next
ठळक मुद्देदुसऱ्या लाटेत जि.प.चे ७६ कर्मचारी बाधितप्राथमिक शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ७६ कर्मचारी बाधित झाले आहेत. यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्यावर्षीच्या लाटेत एकूण २०८ कर्मचारी बाधित झाले होते.

गतवर्षी कोरोना संसर्गानंतर शासनाच्या सुचनांप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बंधने आणण्यात आली होती. तरीही २०८ जण बाधित झाले होते. तर पाचहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला होता. बाधित होणाऱ्यांमध्ये आरोग्य आणि ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक होती.

यंदा १ जानेवारीपासून ७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये प्राथमिक शिक्षण विभागाच्या पंचायत समिती स्तरावरील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच आरोग्य विभागाच्या १४ जणांना बाधा झाली असून यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. ग्रामपंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही लागण झाली असून यामध्ये सर्वांमध्ये करवीर तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

अन्य बाधितांमध्ये सामान्य प्रशासन, जलजीवन मिशन, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, ग्रामीण पाणी परुवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही मुख्यालयातील तर काही पंचायत समिती स्तरावरील आहेत.

Web Title: Corona cases in Kolhapur: 76 employees of ZP affected in second wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.