corona cases in kolhapur : कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये प्रत्येकी ९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 08:24 PM2021-05-24T20:24:04+5:302021-05-24T20:26:14+5:30

corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये कोल्हापूर शहरातील आणि हातकंगणंगले तालुक्यातील प्रत्येकी नऊ जणांचा समावेश आहे. नवे १२४७ रूग्ण नोंदवण्यात आले असून १२१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

corona cases in kolhapur: 9 deaths each in Kolhapur, Hatkanangle | corona cases in kolhapur : कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये प्रत्येकी ९ मृत्यू

corona cases in kolhapur : कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये प्रत्येकी ९ मृत्यू

Next
ठळक मुद्देकोल्हापूर, हातकणंगलेमध्ये प्रत्येकी ९ मृत्यू कोरोनाचा कहर : नवे १२४७ रूग्ण तर ४१ मृत्यू

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासात ४१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. यामध्ये कोल्हापूर शहरातील आणि हातकंगणंगले तालुक्यातील प्रत्येकी नऊ जणांचा समावेश आहे. नवे १२४७ रूग्ण नोंदवण्यात आले असून १२१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोल्हापूर शहर, करवीर आणि हातकणंगले तालुक्यातील कोरोनाची रूग्णसंख्या अजूनही नियंत्रणामध्ये येत नसून ती अनुक्रमे २८३, १४९ आणि १५३ इतकी आहे. इतर जिल्ह्यातील ७१ तर इचलकरंजी शहरातील ७१ जणांना कोरोनाची लाग झाली आहे. सध्या जिल्ह्यात १३ हजार ५२१ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये करवीर, कोल्हापूर शहर मधील मृतांची संख्या जास्त आहे.

मृतांची तालुकावर आकडेवारी

  • कोल्हापूर शहर ०९

आर. के. नगर, टेंबलाईवाडी, साने गुरूजी वसाहत, शुक्रवार पेठ, फुलेवाडी, उद्यमनगर, लक्षतीर्थ वसाहत, संभाजीनगर, मंगळवार पेठ

  • हातकणंगले ०९

तळदंगे कोडोली फाटा, पुलाची शिरोली, धनगर मळा कोरोची, कुंभोज २, माणगाव, रेंदाळ, तळंदगे,रूई

  • करवीर ०६

शिंगणापूर, मोरेवाडी, उचगाव, निगवे दुमाला, वडणगे, कणेरी

  • गडहिंग्लज ०४

हलकर्णी, हिटणी, उंबरवाडी, कुमरी

  • इचलकरंजी ०२

शहापूर, अवधूतनगर

  • चंदगड ०२

हेरे, कडलगे

  • शाहूवाडी ०१

निळे मलकापूर

  • पन्हाळा ०१

कोडोली

  • कागल ०१

करनूर

  • शिरोळ ०१

जयसिंगपूर

  • इतर ०५

वैभवनगर बेळगाव, कारदगा, सावंतवाडी, दक्षिण गोवा, सौंदलगा

 

Web Title: corona cases in kolhapur: 9 deaths each in Kolhapur, Hatkanangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.