corona cases in kolhapur : १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 11:29 AM2021-05-29T11:29:47+5:302021-05-29T11:32:09+5:30
corona cases in kolhapur : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी शुक्रवारी वसूल केला. विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त केली.
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्यानुसार १३३२ जणांकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड पोलिसांनी शुक्रवारी वसूल केला. विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त केली.
दिवसभरात २७२ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. त्यात ६१,९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मोटारवाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३३२ जणांवर खटले दाखल करून त्यांच्याकडून ३ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला.
विनाकारण फिरणाऱ्या ८५ जणांची वाहने जप्त करण्यात आली. दोन जणांवर गुन्हे दाखल केले. याशिवाय २४ आस्थापनांवर गुन्हे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडूनही १३ हजार २०० रुपये दंड भरून घेण्यात आला. मॉर्निंग वॉकला गेलेल्या १९ जणांवरही कारवाई करीत २ हजारांचा दंड करण्यात आला.
आजपर्यंतची कारवाई अशी
- मास्क कारवाई - २१८५२ जणांकडून ४८ लाख ७२ हजार ९६३ दंड वसूल
- वाहन जप्त - ७३६३
- मोटर वाहन केसेस - ८२८९६
- मोटार वाहन दंड - १कोटी ४५ लाख ६१ हजार ८००
- गुन्हे दाखल - ९८
- आस्थापना कारवाई- ४४२
- आस्थापनांवर दंड - ५ लाख ६१ हजार ८००
- मॉर्निंग वॉक - २४८६
- मॉर्निंग वॉक दंड - ८ लाख ८१ हजार ९७०