corona cases in kolhapur : रूग्ण वाढले, मृत्यूही वाढले, नवे ११९७ रुग्ण, ३४ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:19 AM2021-06-17T11:19:42+5:302021-06-17T11:22:34+5:30
corona cases in kolhapur : दोन दिवस रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटल्याने दिलासा मिळाला असतानाच तिसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासात पुन्हा रुग्णांची संख्या आणि मृत्यूसंख्या वाढली आहे. नवे ११९७ रुग्ण नोंदवण्यात आले असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोल्हापूर : दोन दिवस रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटल्याने दिलासा मिळाला असतानाच तिसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासात पुन्हा रुग्णांची संख्या आणि मृत्यूसंख्या वाढली आहे. नवे ११९७ रुग्ण नोंदवण्यात आले असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
गेल्या २४ तासात १४ हजारांहून अधिक विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १४९५ रुग्णांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर शहरात ३१९, करवीर तालुक्यात २५४ आणि हातकणंगले तालुक्यात १५३ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरातील ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून करवीर आणि शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी चारजणांचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुकावार मृत्यू
- कोल्हापूर ०९
बालाजी पार्क, टेंबलाईवाडी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, विचारे माळ, रुईकर कॉलनी, प्रतिभानगर, जरगनगर, शाहुपुरी, शाहू नाका
- करवीर ०४
नेर्ली, उचगाव, शिंगणापूर, दऱ्याचे वडगाव
- शिरोळ ०४
तमदलगे, नांदणी, चिंचवाड, शिरोळ
- हातकणंगले ०३
माणगाव, तारदाळ, सावर्डे
- भुदरगड ०२
एरंडपे, शेणगाव
- गडहिंग्लज ०१
अत्याळ
- कागल ०१
कागल
- आजरा ०१
मुमेवाडी
- चंदगड ०१
हेरे
- पन्हाळा ०१
बाजारभोगाव
- इचलकरंजी ०१
- राधानगरी ०१
फेजिवडे
- इतर जिल्हे ०५
बोरगाव, निपाणी, गांधीनगर वाळवा, विठ्ठलवाडी, वरचीवाडी मालवण