corona cases in kolhapur : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 09:03 PM2021-06-14T21:03:16+5:302021-06-14T21:05:11+5:30
corona cases in kolhapur : गेल्या पंधरा दिवसांत पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या २४ तासांत नवे ११८४ रुग्ण नोंदविण्यात आले असून त्यापेक्षा जास्त १५६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांत पहिल्यांदाच नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली असून गेल्या २४ तासांत नवे ११८४ रुग्ण नोंदविण्यात आले असून त्यापेक्षा जास्त १५६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य सूचनेनुसार कोरोना चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे आज मंगळवारपासून पुन्हा पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.
गेले पंधरा दिवस १४०० च्या वर रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या येत होती. ती सोमवारी १२०० च्या आत आली आहे. कोल्हापूर शहरात ३४० जणांना कोरोनाची बाधा झाली असून करवीर तालुक्यात १८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. हातकणंगलेत तालुक्यात १२६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोल्हापूर शहर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सात जणांचा मृत्यू झाला असून त्याखालोखाल करवीर आणि शिरोळ तालुक्यात प्रत्येकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू
- कोल्हापूर ०७
राजारामपुरी, कोल्हापूर, शिवाजी पेठ, साने गुरुजी वसाहत, फुलेवाडी २, विक्रमनगर
- हातकणंगले ०७
साजणी, चंदूर, आळते, हालोंडी, नागाव, हेर्ले, पेठवडगाव
- करवीर ०५
दऱ्याचे वडगाव, खुपिरे, वडणगे, म्हारूळ, आर. के. नगर
- शिरोळ ०५
टाकवडे, दत्तवाड, सैनिक टाकळी, औरवाड, जयसिंगपूर
- इचलकरंजी ०४
गावभाग, लिंगडे मळा, इचलकरंजी २
- चंदगड ०२
किटवाड, बोक्याल
- गडहिंग्लज ०१
- आजरा ०१
मुमेवाडी
- पन्हाळा ०१
बोरपाडळे
- गगनबावडा ०१
मुटकेश्वर
- इतर ०३
इस्लामपूर, शेमनेवाडी, विजयदुर्ग