corona cases in kolhapur : धोका कायम, नवे रुग्ण १७८५, मृत्यू ३१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 11:03 AM2021-06-25T11:03:52+5:302021-06-25T11:05:48+5:30
corona cases in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७८५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ३१ जणांचा मृत्यू झाला असून ११५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ९६५३ जणांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यातील चाचण्या वाढवल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांचीही संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात १७८५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ३१ जणांचा मृत्यू झाला असून ११५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ९६५३ जणांवर उपचार सुरू आहेत.
अधिकाधिक चाचण्या करून कोरोनाचा संभाव्य प्रसार टाळण्यासाठी सध्या प्रशासन आणि आरोग्य विभागाने जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गेल्या २४ तासांत २९ हजार ५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे करवीर तालुक्यातील असून ती संख्या ९ इतकी आहे. त्या खालोखाल कोल्हापूर शहरात आणि हातकणंगले तालुक्यात पाच मृत्यू झाले आहेत.
शहरापेक्षा करवीर तालुक्यातील संख्या अधिक
कोल्हापूर शहरापेक्षा करवीर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी अधिक आली आहे. कोल्हापूर शहरात ३८३ आहे आणि करवीर तालुक्यातील ४२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. हातकणंगले तालुक्यात २२४ जणांना कोरोना झाला आहे.
जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू
- करवीर ०९
ग्रामीण, मणेरमळा, कांडगाव, घानवडे, सोनाळी, सडोली दुमाला, निगवे दुमाला, पिरवाडी
- कोल्हापूर शहर ०५
विक्रमनगर, साळोखेनगर, शुक्रवार पेठ, नाळे कॉलनी, मंगळवार पेठ
- हातकणंगले ०५
शिरोली एमआयडीसी, रूकडी, आळते, हातकणंगले, साखरवाडी
- शिरोळ ०४
घोसरवाड, दानोळी, कुरूंदवाड, जयसिंगपूर
- कागल ०२
मुरगुड, चौंडाळ
- शाहूवाडी ०२
पणुंद्रे २
- भुदरगड ०१
आकुर्डे
- राधानगरी ०१
धामोड
- इतर जिल्हे ०२
बेळगाव, रत्नागिरी