corona cases in kolhapur : ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 06:58 PM2021-05-08T18:58:56+5:302021-05-08T19:05:08+5:30

CoronaVIrus Kolhapur : कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सीजनची मागणी वाढली आहे ही वाढती मागणी पूर्ण करताना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत होत असून प्रशासनाने सर्व रुग्णालयांना ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सुचना शनिवारी दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी रुग्णालयांना ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची बैठक घेवून त्यांना याबाबत अलर्ट केले आहे.

corona cases in kolhapur: Use oxygen sparingly | corona cases in kolhapur : ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करा

corona cases in kolhapur : ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करा

Next
ठळक मुद्देऑक्सीजनचा काटकसरीने वापर कराजिल्हा प्रशासनाच्या रुग्णालयांना सुचना

कोल्हापूर : कोरोना रुग्णांसाठी सध्या ऑक्सीजनची मागणी वाढली आहे ही वाढती मागणी पूर्ण करताना जिल्हा प्रशासनाची तारेवरची कसरत होत असून प्रशासनाने सर्व रुग्णालयांना ऑक्सीजनचा काटकसरीने वापर करण्याच्या सुचना शनिवारी दिल्या. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी रुग्णालयांना ऑक्सीजनचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची बैठक घेवून त्यांना याबाबत अलर्ट केले आहे.

सध्या जिल्ह्यात ५० टन ऑक्सीजनची मागणी असतान ४० टनापर्यंत ऑक्सीजनचा पुरवठा होत आहे. बेल्लारीतून ऑक्सीजन पुरवठा बंद झाल्यानंतर शनिवारपासून पुणे व रायगड येथून ऑक्सीजन पुरवठा सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाचा जीव भांड्यात पडला असला तरी रोज वाढत जाणारी मागणी पूर्ण करण्याचे संकट समोर आहेच.

त्यामुळे पुढचा टँकर कोल्हापुरात दाखल होईपर्यंत अधिकारीच ऑक्सीजनवर असतात. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली वितरकांचीही बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.

 

Web Title: corona cases in kolhapur: Use oxygen sparingly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.