corona cases in kolhapur : कोल्हापुरातल्या तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 12:34 PM2021-06-13T12:34:57+5:302021-06-13T12:38:11+5:30
corona cases in kolhapur : प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पीएचडी मिळवलेल्या कोल्हापूर येथील मारुती नागोजी पाटील या तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मारुती पाटील हे अवघ्या 38 वर्षांचे होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकमधील मणिकेरी असूनही महाराष्ट्रात स्वतःचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी इतिहास या विषयात पीएचडी मिळवली होती. ते कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून नोकरीवर करत होते.
कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पीएचडी मिळवलेल्या कोल्हापूर येथील मारुती नागोजी पाटील या तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मारुती पाटील हे अवघ्या 38 वर्षांचे होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकमधील मणिकेरी असूनही महाराष्ट्रात स्वतःचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी इतिहास या विषयात पीएचडी मिळवली होती. ते कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून नोकरीवर करत होते.
मारुती पाटील यांच्या घरची परिस्थिती बेताची असतानाही कोल्हापूर शहरात राहून त्यांनी स्वतःच शिक्षण पूर्ण केलं होतं.कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पीएचडी मिळविली होती. गेल्या दीड महिन्यांपासून ते कोल्हापूर शहरातल्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र उपचारांना यश न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात असणाऱ्या कौलगे या गावात राहून त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ते कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून नोकरीवर करत होते. दीड महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांना उपचारासाठी शहरातील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र एवढ्या दिवसांच्या उपचारांनाही शेवटी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात त्यांचे आई वडील आणि छोटासा परिवार असून त्यांच्या अशा अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मारुती पाटील हे मेहनती, मनमिळावून स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.