बावड्यात सुरू होणार ४५ बेडचे कोरोना सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:03+5:302021-04-24T04:23:03+5:30
डी वाय पाटील ग्रुप ,कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व रोटरी क्लब यांच्यातर्फे हे सेंटर सुरू करण्यात येत आहे. यापूर्वीही ...
डी वाय पाटील ग्रुप ,कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन व रोटरी क्लब यांच्यातर्फे हे सेंटर सुरू करण्यात येत आहे. यापूर्वीही या ठिकाणी कोरोना सेंटर सुरू होते. नंतर रुग्णांची संख्या कमी कमी होत गेल्याने हे सेंटर बंद करून सेंटरमधील सर्व साहित्य अन्यत्र हलवण्यात आले होते. नंतर हा हॉल बॅडमिंटनसाठी खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आला होता.
सध्या कोरोनाचे पेशंट पुन्हा वाढू लागल्याने या ठिकाणी पुन्हा कोरोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे सेंटर उभारण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. या ४६ बेडपैकी २० बेड महिलांसाठी वरच्या मजल्यावर, तर २६ बेड पुरुषांसाठी हॉलमध्ये असणार आहेत. येत्या चार दिवसांत हे कोरोना सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल, असे गजानन बेडेकर म्हणाले.
दरम्यान, या कोविड सेंटरची उपशहर अभियंता हर्षल घाडगे व डॉ. मनाली मिठारी यांनी पाहणी केली.
फोटो :२३ कसबा बावडा कोरोना सेंटर
कसबा बावडा पॅव्हेलियन येथे ४६ बेडचे सुसज्ज असे कोविड सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे. त्याची पाहणी उपशहर अभियंता हर्षल घाडगे, डॉ. मनाली मिठारी व सामाजिक कार्यकर्ते गजानन बेडेकर यांनी केली.