कोरोना महामारीमुळे करवीर तालुक्यात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:17 AM2021-06-26T04:17:51+5:302021-06-26T04:17:51+5:30

लोकमत न्युज नेटवर्क सावरवाडी : गतवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मात्र कृषी क्षेत्राची मोठी ...

Corona epidemic hits marigold farmers in Karveer taluka | कोरोना महामारीमुळे करवीर तालुक्यात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना फटका

कोरोना महामारीमुळे करवीर तालुक्यात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना फटका

Next

लोकमत न्युज नेटवर्क

सावरवाडी : गतवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मात्र कृषी क्षेत्राची मोठी हानी झाली. भाजीपाला पिकांच्या उत्पादनात घट झाली. ग्रामीण भागातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

बाजारपेठेत झेंडू फुलांचे वारंवार कोसळणारे दर आणि लॉकडाऊनमुळे झेंडू फुलांची विक्री घटली गेली. झेंडू फूलशेती उत्पादन खर्च व मिळणार भाव यांचा मेळ बसत नाही. कोरोनासारख्या महामारीमुळे करवीर तालुक्यात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.

ऊस लागणीच्या क्षेत्रामध्ये अंतरपीक व मोकळ्या जमिनीमध्ये झेंडू फूल पिकांची लागवड केली जाते. फूल शेतीतून शेतकऱ्यांना जादा आर्थिक उत्पन्न मिळते. म्हणून शेतकऱ्यांचा फूलशेतीकडे कल आहे. शेतीमध्ये पिवळा, नारंगी रंगाचे झेंडू पिकाचे उत्पादन घेतले जाते.

गतवर्षापासून कोरोना महामारीच्या काळात एप्रिल-मे महिन्यात लॉकडाऊनामुळे झेंडू फुलांचे उत्पादन शेतकऱ्यांनी थांबविले. सार्वजनिक ग्रामदैवतांची मंदिरे बंद असल्याने धार्मिक कार्यक्रम रद्द झाले. लग्नसराई ही थांबली गेली आहे. बाजारपेठेत फुलांची आवक कमी झाल्याने झेंडू फुलांची यंदाही टंचाई भासू लागली. अस्थीर बाजारभावामुळे ही गडगडले. लॉकडाऊनचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला गेला. कोरोनामुळे झेंडू फुलांची लागवड थंडावली गेली.

जिल्ह्याबाहेर फूलवाहतूक ठप्प

लॉकडाऊनमुळे मुंबई, पुणे, रत्नागिरी, गोवा, निपाणी या बाजारपेठेत झेंडू फुलांची होणारी वाहतूक थांबली, त्यामुळे फुलांची विक्री ही होऊन शकली नाही. फूलशेतीमध्येच राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.

कोट - कोरोनामुळे झेंडू पीक तोट्यात

गतवर्षाप्रमाणे यंदाही कोरोनामुळे झेंडू उत्पादनात घट झाली आहे झेंडू फूल पिकातून उत्पादन खर्च ही निघत नाही. जिल्हा बंदीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो

कुमार दिंडे

(फूल उत्पादक शेतकरी, बहिरेश्वर)

फोटो ओळ - = कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन घटले आहे. जिल्हा बंदीमुळे शेतीत झेंडू फूल पीक शेतीमध्ये आहेत.

Web Title: Corona epidemic hits marigold farmers in Karveer taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.