कोरोनाच्या महामारीत सर्वांची मानसिकता बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:18 AM2021-07-01T04:18:07+5:302021-07-01T04:18:07+5:30
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित आॅनलाईन कोरोना प्रबोधनपर व्याख्यानात ते 'कोरोना ...
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित आॅनलाईन कोरोना प्रबोधनपर व्याख्यानात ते 'कोरोना काळातील आरोग्य संवर्धन' या विषयावर बोलत होत्या.
डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रस्तावना करून 'माझे गाव कोरोनामुक्त गाव' या शिवाजी विद्यापीठांतर्गत राबविल्या जाणा-या अभियानाचे स्वरूप सांगितले.
डॉ. गुरव म्हणाल्या स्वच्छतेच्या सवयी आयुष्यभर आरोग्यपूर्ण ठरतात. कोरोना काळात अधिक काळासाठी उपाशी राहू नका. त्यामुळे भरपूर खायला हवे, ताजे जेवण घ्या. मला आजाराला हरवण्यासाठी खायला पाहिजे ही इच्छाशक्ती बाळगूनच तुम्ही यशस्वी व्हाल. कोरोनाला टक्कर देण्यासाठी सकस आहार, व्यायाम, विश्रांती व आवश्यक झोप महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.
मानसिक आरोग्य, ताणतणावापासून दूर रहा, धीट बना असा सल्लाही गुरव यांनी दिला.
यावेळी प्र. प्राचार्य प्रा. पी. ए पाटील, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. सी. एल. तेली यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. जे. जे. व्हटकर यांनी आभार मानले.