कोरोना वाढीला ब्रेक : 1161 नवे रुग्ण, 52 मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:24 AM2021-05-17T04:24:32+5:302021-05-17T04:24:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच कोरोना वाढीला ब्रेक मिळाला आहे, कोरोनाबाधितांचे रोज दीड ...

Corona growth break: 1161 new patients, 52 deaths | कोरोना वाढीला ब्रेक : 1161 नवे रुग्ण, 52 मृत्यू

कोरोना वाढीला ब्रेक : 1161 नवे रुग्ण, 52 मृत्यू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच कोरोना वाढीला ब्रेक मिळाला आहे, कोरोनाबाधितांचे रोज दीड हजारावर जाणारे आकडे 1161 पर्यंत खाली आले आहेत. मृत्यूही कमी होत 52 वर आले आहेत. बधितापेक्षा बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढून ते तब्बल 1561 इतके झाले आहे.

या आठवड्यात कोरोनाबधितांची आकडेवारी सातत्याने दीड दोन हजारावर जात असल्याने रविवारपासून आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तापसलेले स्वॅब पाहता ही आकडे आठ दिवसांत पहिल्यादाच दीड हजाराच्या खाली आली आहे. 52 जणांचा बळी गेला आहे. यातील 14 जण इतर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 38 मृत्यू आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णाची संख्याही 13 हजार 27 वर गेली आहे.

गगनबावडा कोरोनामुक्त

कोल्हापूर शहरासह करवीर शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज येथे रुग्णसंख्या वाढत असताना डोंगरदऱ्यांच्या कुशीतील गगनबावडा मात्र कोरोनामुक्त होताना दिसत आहे. रविवारी तिथे एकही नवा रुग्ण सापडला नाही की मृत्यूही झाला नाही, हे विशेष.

रविवारी 5 वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या 1161 नव्या रुग्णांपैकी 62 पर जिल्हा व परराज्यातील आहेत.

जिल्ह्यात या ठिकाणी झाले कोरोनाचे मृत्यू

कोल्हापूर शहर मृत्यू : 14

शुगर मिल, आयसोलेशन, कसबा बावडा, कनाननगर, जाधववाडी, बुधवार पेठ, महाराष्ट्र नगर, शिवाजी पेठ, साम्राटनगर,दे वकर पाणंद, साने गुरुजी वसाहत, चिंतामणी पार्क, शाहूपुरी, संध्यामठ

करवीर : 04 नेर्ली सोनतळी, गांधीनगर, खुपिरे

शिरोळ : 01 धरणगुती

इचलकरंजी : 01 केटकळे गल्ली

हातकणंगले : 05 माणगाव, वडगाव, तारदाळ, पट्टण कोडोली, रुई, शिरोली

राधानगरी : 02 पाडळी, नरतवडे

गडहिंग्लज : 02 गडहिंग्लज, काळामवाडी,

चंदगड : 03 हिंडगाव, कानूरखुर्द, कोलीक,

पन्हाळा : 03 वाघवे, यवलूज, मोटल वाडी

आजरा : 02 किनी, उत्तूर

Web Title: Corona growth break: 1161 new patients, 52 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.