corona virus-परदेशांतून आलेल्या ८ जणांची कोरोना संशयावरून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 03:36 PM2020-03-11T15:36:00+5:302020-03-11T15:46:24+5:30

इटली, दुबई व इराणमधून येथे आलेल्या आठ जणांची येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील विशेष कक्षात मंगळवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून तपासणी करण्यात आली.

Corona inquiries of six persons from overseas | corona virus-परदेशांतून आलेल्या ८ जणांची कोरोना संशयावरून तपासणी

corona virus-परदेशांतून आलेल्या ८ जणांची कोरोना संशयावरून तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देघशात खवखवने भिती : शंकेवरून रुग्ण स्वत:हून हजर १५ दिवस बारकाईने नजर

कोल्हापूर : इटली, दुबई व इराणमधून येथे आलेल्या आठ जणांची येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील विशेष कक्षात मंगळवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून तपासणी करण्यात आली. हे आठजण येथून प्रवास करून कोल्हापुरात परतले आहेत; पण त्यांच्यात कोरोनासदृश आजाराची लक्षणे न आढळल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. पंधरा दिवस कोणाच्याही संपर्कात न राहण्याचे त्यांना सूचना देण्यात आल्या असून आरोग्य प्रशासन त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

तपासणी करण्यात आलेले आठही जण गेल्या १० दिवसांत परदेशी प्रवास करून परतले आहेत. त्यांच्या घशात खवखव, सर्दी-खोकला झाल्याने त्यांच्यात कोरोना आजाराचा संशय बळावला. या सर्वांची तपासणी करण्यात आली; पण त्यांच्यात या आजाराची लक्षणे आढळली नाहीत. त्यांपैकी एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी इटली येथे विद्यापीठात शिक्षण घेत होते.

कोरोना प्रादुर्भावामुळे तेथील विद्यापीठे बंद ठेवल्याने ते दोघे १० दिवसांपूर्वी कोल्हापुरात परतले आहेत. याशिवाय व्यवसायानिमित्त इटलीत फिरलेले एकजण दि. ३ मार्चला कोल्हापुरात परतले. दुबई येथून गेल्या आठवड्यात परतलेल्या दोघांनीही संशयावरून स्वत:ची तपासणी करून घेतली. ते दोघेही इचलकरंजी येथील रहिवासी आहेत. हे पर्यटनासाठी दुबईला गेले होते.

हज यात्रेहून काहीजण मंगळवारी सकाळी कोल्हापुरात परतले. त्यांपैकी तिघाजणांनी तातडीने स्वत:हून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ‘सीपीआर’मध्ये तपासणी करून घेतली. यामध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.

तपासलेले रुग्ण इचलकरंजीसह गडहिंग्लजचे
मंगळवारी दिवसभर तपासणी केलेल्या रुग्णांपैकी इचलकरंजीतील दोन, शाहूपुरी, लक्ष्मीपुरीसह गडहिंग्लज येथील प्रत्येकी एकजण; तर शेंडा पार्कमधील तीन रहिवासी आहेत. त्यांच्यावर जिल्हा आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून आहे.

संपर्क न ठेवू नका

हज यात्रेहून परतल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नातेवाइकांची गर्दी होते; पण त्यांनी कोणताही समारंभ करू नये. कोणाच्याही संपर्कात न येता १५ दिवस घरातच राहून स्वत:ची काळजी घ्यावी. आजाराचा संशय वाटल्यास ‘सीपीआर’शी संपर्क साधण्याचे त्यांना आवाहन करण्यात आले आहे.

आतापर्यंत १४ जणांची तपासणी

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होत असल्याच्या भीतीने गेल्या महिनाभरात परदेशातून आलेल्या एकूण १२ जणांनी स्वत:हून ‘सीपीआर’मध्ये येऊन तपासणी करून घेतली आहे; पण त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याचे कोरोना प्रतिबंध कक्ष प्रमुख डॉ. विलास बरगे व साहाय्यक डॉ. अनुराग गुप्ता यांनी सांगितले.

‘सीपीआर’मध्ये कोरोना कक्ष सज्ज
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी ‘सीपीआर’मध्ये २० बेडचा विशेष कक्ष उघडला आहे. या ठिकाणी स्वतंत्र व्हेंटिलेटर सुविधेसह डॉक्टर, कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 

Web Title: Corona inquiries of six persons from overseas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.