corona in karnataka-मुंबई कनेक्शन वाढलं, बेळगावात 2 तर कर्नाटकात 84 नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 06:26 PM2020-05-18T18:26:31+5:302020-05-18T18:28:11+5:30
बेळगावात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण पोजिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे तर कर्नाटक राज्यात सकाळच्या बुलेटिन मध्ये 84 नवीन रुग्ण सापडले आहेत.राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1231 झाली असून एकूण 84 पैकी 57 रुग्ण मुंबई महाराष्ट्र कनेक्शनचे आहेत.
बेळगाव : बेळगावात आणखी दोघे जण कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 वर पोहोचली आहे. कर्नाटक राज्यात सकाळच्या बुलेटिन मध्ये 84 नवीन रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 1231 झाली असून एकूण 84 पैकी 57 रुग्ण महाराष्ट्र राज्यातील मुंबई कनेक्शनचे आहेत.
बेळगावात 2 नवीन तर राज्यात 84 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.सोमवारी सकाळी राज्य आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिन मध्ये बेळगावात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे 23 वर्षीय युवक आहेत त्यांना बाधा झाली आहे.
या दोघांतील एक मुंबई कनेक्शन आहे तर एक जण दिल्ली मरकज रिटर्न असलेल्या या रुग्णाच्या दुय्यम संपर्कात आलेला आहे.