हेरले येथे ४८ तासात कोरोनाने ६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:23 AM2021-05-15T04:23:27+5:302021-05-15T04:23:27+5:30
गतवर्षी गावांमध्ये कोरोनाची पहिली लाट आली प्रशासनाने गावात अतिशय कडक भूमिका घेऊन कोरोनाला थोपविण्याचा प्रामाणिकपणे ...
गतवर्षी गावांमध्ये कोरोनाची पहिली लाट आली प्रशासनाने गावात अतिशय कडक भूमिका घेऊन कोरोनाला थोपविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. तरीही दुर्दैवाने गावातील ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
सध्या गावात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. आज अखेर गावांमध्ये कोरोना चे ९१ रुग्ण आहेत. गावात आजअखेर कोरोनामुळे मयत झालेल्या रुग्णांची संख्या १० आहे. पण गेल्या ४८ तासात गावात कोरोना मुळे ६ जण मृत्युमुखी पडले आहेत ही गावासाठी अतिशय चिंताजनक बाब आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने गावात अतिशय कडक धोरण अवलंबून निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
गावांमध्ये दररोज कोरोना सर्वेक्षण करून कोरोना लक्षण असणाऱ्या सर्व रुग्णांना तातडीने योग्य ते औषधोपचार करून मयत रुग्णांचा आकडा कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गावामध्ये सध्या डॉ. राहुल देशमुख व आरोग्य सेवक रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली आशा वर्कर व प्राथमिक शिक्षक जीवावर उदार होवून पुरेशी वैद्यकीय साधने नसतानाही सर्वेक्षनाचे काम करीत आहेत. याला सर्वच लोकप्रतिनिधी यांनी साथ देणे गरजेचे बनले आहे.सर्वांनीच सामुदायिक प्रयत्न केल्यास कोरोनाची महामारी आटोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.