corona in kolhapur-कोल्हापूरात आणखीन १६ जणांना लागण, कोरोनाबाधितांची संख्या आता १७१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:57 PM2020-05-20T17:57:14+5:302020-05-20T18:00:42+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५. ३0 वाजता आणखी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून सकाळच्या सत्रात १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाने कळविले होते. त्यामुळे आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७१ इतकी झाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५. ३0 वाजता आणखी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून सकाळच्या सत्रात १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाने कळविले होते. त्यामुळे आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७१ इतकी झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालेले १३६ रूग्ण आढळले होते. सकाळी आणखीन १९ रुग्णांची भर पडली होती, तर सायंकाळी आणखीन १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्वजण कोणत्या तालुक्यातील आहेत, याची सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
कोल्हापूर नॉन रेड झोनमध्ये, काय सुरू, काय बंद राहणार
- हे सुरू राहणार
- स्पा, सलून, केशकर्तनालये
- रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी (एक चालक आणि दोन प्रवासी)
- कुरिअर, टपाल
- स्टेडियम (प्रेक्षकांविना)
- दवाखाने, ओपीडी
- दुचाकी (एक व्यक्ती)
- दारूची दुकाने
- आंतरजिल्हा बससेवा
- वस्तूंचा पुरवठा
- शहर आणि ग्रामीण भागातील उद्योग
- शहरांतील बांधकामे (प्रकल्पाची साईट)
- इतर बांधकामे
- एकल आणि अत्यावश्यक वस्तूंची दुकाने
- अत्यावश्यक आणि आवश्यक नसलेले ई-कॉमर्स खासगी कार्यालये
- सरकारी कार्यालये
- कृषी
- बँका, वित्तसंस्था
- वैद्यकीय अत्यावश्यक सेवा
- रेस्टॉरंट (घरपोच सेवा)
- सब रजिस्ट्रार, आरटीओ
- हे बंद राहणार
- विमान आणि रेल्वेसेवा
- शैक्षणिक संस्था
- हॉटेल, शॉपिंग मॉल
- धार्मिक स्थळे आणि मोठे कार्यक्रम
- ६५ वर्षांवरील, १० वर्षांवरील व्यक्ती आणि गर्भवती यांचे बाहेर जाणे