Corona in kolhapur : 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227, परराज्यातील 581-जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:18 PM2020-04-07T18:18:03+5:302020-04-07T18:18:03+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 तर परराज्यातील 581जण विलगिकरण केल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 227 आणि परराज्यातील 581 अशा एकूण 808 जणांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 20 परराज्यातील ४ अशा 24 जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे.
रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत राज्यातील २० परराज्यातील ८ अशा २८ जणांचा समावेश असून याची क्षमता ५० जणांची आहे. मुलींची शाळा क्र. ६ लाईन बाजार येथे परराज्यातील ७ असून याची क्षमता २५ जणांची आहे.
करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील २ परराज्यातील ३५ एकूण ३७ जण असून क्षमता ७० जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी - राज्यातील ८, परराज्यातील 30 असे एकूण 38 असून याची एकूण क्षमता ५० जणांची आहे.
कागल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल येथे राज्यातील ३ परराज्यातील ९७ एकूण १०० जण असून क्षमता ११३ जणांची आहे. जयसिंगराव घाटगे विद्यालय येथे राज्यातील 23 परराज्यातील 95 असे एकूण 118 जण असून क्षमता 130 जणांची आहे.
हातकणंगले-घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव येथे परराज्यातील 78 जण असून क्षमता १०० जणांची आहे. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव राज्यातील २ परराज्यातील 104 असे एकूण 106 जण असून क्षमता ११५ जणांची आहे.
शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील ४३ परराज्यातील ८ एकूण ५१ जण असून क्षमता ५५ जणांची आहे. राजीव गांधी भवन इचलकरंजी येथे राज्यातील ६४ जण असून क्षमता ७० जणांची आहे
शिरोळ- शाळा क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील १४ परराज्यातील १७ असे एकूण ३१ क्षमता ५० आहे.
गडहिंग्लज- देवदासी छात्र वसतीगृह, संकेश्वर रोड, गडहिंग्लज येथे राज्यातील १० परराज्यातील १ एकूण ११ असून क्षमता २४ जणांची आहे,
गगनबावडा- माधव विद्यालय गगनबावडा येथे राज्यतील १३ जण असून क्षमता २० जणांची आहे. समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील ५ परराज्यातील ९७ असे एकूण १०२ असून क्षमता १०५ जणांची आहे.
यामध्ये तामिळनाडूमधील 198, कर्नाटकातील 215, राजस्थानमधील ८१, मध्यप्रदेशमधील 44, उत्तर प्रदेशमधील 29, केरळमधील 10, पाँडेचरीमधील २,
पश्चिम बंगालमधील १ बिहार १ अशा एकूण ९ राज्यातील 581 जणांचा तसेच महाराष्ट्रातील 227 असे मिळून 808 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.