corona in kolhapur -जिल्ह्यात 9 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 1 हजार 73 जणांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 11:16 AM2020-05-08T11:16:37+5:302020-05-08T11:18:13+5:30
जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 73 जण घेत आहेत.
कोल्हापूर : जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 73 जण घेत आहेत.
करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी, लक्ष्मीपुरी. हातकणंगले- घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- माधव विद्यालय आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. राधानगरी - पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानगरी. कागल - श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल. नवोदय विद्यालय कागल अशा नऊ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.