corona in kolhapur- पेठवडगावमध्ये कोणीही कोरोनाही बांधित नाही : राजूबाबा आवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 06:38 PM2020-03-26T18:38:29+5:302020-03-26T18:40:38+5:30
पेठ वडगाव व परिसराबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.
पेठवडगाव : पेठ वडगाव व परिसराबाबत सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या अफवांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजूबाबा आवळे यांनी केले.
पेठ वडगावमधील एक कुटुंबीय इस्लामपूर येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याच्या पार्श्व•ाूमीवर प्रशासनाने या कुटुंबातील अकरा जणांना इंचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.
शहरातील लोकांना अशाप्रकारे रुग्णालयात दाखल केल्यानंतर पेठ वडगाव परिसरात जिल्ह्यात वेगवेगळ्या अफवा पसरल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी आमदार राजूबाबा आवळे यांनी वडगावला भेट देत नगरपालिकेत वरिष्ठ अधिकार्यांकडून याविषयी माहिती घेतली. तसेच यावेळी विविध उपाययोजनाचा आढावा घेतला.
दरम्यान मतदारसंघातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवतात. प्रशासनाने सांगितलेल्या सुचनाचे पालन करावे. घरात राहून लॉकडाऊन यशस्वीपणे पूर्ण करावा असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष मोहन माळी, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते
मास्कचे वाटप
नगरपालिका प्रशासन, आरोग्य कर्मचारी ,सफाई कर्मचारी करत असलेल्या कामाचे राजूबाबा आवळे यांनी कौतूक केले. तसेच दररोज लागणार्या मास्कचा विचार करत कर्मचार्याना मास्कचे वाटप केले.