corona in kolhapur-महापालिका कार्यालयात स्प्रिंकलर सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:11 PM2020-04-10T17:11:54+5:302020-04-10T17:13:39+5:30
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह चारही विभागीय कार्यालयांत सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर बसविलेल्या सॅनिटायझर स्प्रिंकलरचे उद्घाटन महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह चारही विभागीय कार्यालयांत सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर बसविलेल्या सॅनिटायझर स्प्रिंकलरचे उद्घाटन महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले.
नगरसेवक शेखर कुसाळे, धीरज पाटील यांच्या पुढाकारातून येथील महाराष्ट्र हायस्कू लमधील १९९३ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थी स्वखर्चाने ही सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविणार आहेत. महानगरपालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तसेच येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेपोटीही सॅनिटायझर स्प्रिंकलर महत्त्वाची ठरणार आहेत.
मुख्य प्रशासकीय कार्यालय, गांधी मैदान विभागीय कार्यालय, शिवाजी मार्केट व ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयातही ही यंत्रे बसविली बसविण्यात आली. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात मात्र असे सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.