कोरोना रुग्णसंख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:59+5:302021-08-24T04:29:59+5:30

कोल्हापूर :गेल्या चोवीस तासांत नवे २१८ रुग्ण आढळले तर सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृत्यूमध्ये कोल्हापूर शहरातील चाैघांचा समावेश आहे. ...

Corona morbidity decreased | कोरोना रुग्णसंख्या घटली

कोरोना रुग्णसंख्या घटली

Next

कोल्हापूर :गेल्या चोवीस तासांत नवे २१८ रुग्ण आढळले तर सात कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. मृत्यूमध्ये कोल्हापूर शहरातील चाैघांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण संख्या दिवसेंदिवस घटत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नवे २१८ रुग्णांची भर पडली असली तरी उपचार घेऊन बरे झालेल्या ३६४ रुग्णांचा डिस्चार्ज झाला आहे.

नव्या रुग्णसंख्येत कोल्हापूर शहर ३६, करवीर तालुका - ४०, हातकणंगले - ३७, अशा रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील सानेगुरुजी वसाहत-२, रिंगरोड आपटेनगर, नागाळा पार्क प्रत्येकी एक रुग्णांचा व इचलकरंजी व पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय चिकोडी तालुक्यातील कोरोची येथील ४४ वर्षीय महिलेचाही सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ५६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Corona morbidity decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.