कोरोना ओसरला, नव्या रुग्णांत घट, नवे ११ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 21:29 IST2020-12-12T21:25:18+5:302020-12-12T21:29:15+5:30
CoronaVirusUnlock, kolhapurnews गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले; तर सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेत कोरोनाला हद्दपार करण्याची नागरिकांनी तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे.

कोरोना ओसरला, नव्या रुग्णांत घट, नवे ११ रुग्ण
कोल्हापूर : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कोरोनाचे ११ नवे रुग्ण आढळले; तर सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेत कोरोनाला हद्दपार करण्याची नागरिकांनी तयारी केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा जिल्ह्यातील एकूण आकडा ४९२६७ वर पोहोचला असला तरीही उपचाराअंती बरे होऊन घरी परतल्यानंतर सध्या फक्त १७१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत अथवा घरात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत कोल्हापूर शहरात पाच, नगरपालिका हद्दीत दोन, हातकणंगले तालुक्यात एक, तर परजिल्ह्यात तीन असे सुमारे ११ रुग्ण नव्याने आढळले. दिवसभरात २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सुदैवाने एकाचाही मृत्यू झालेला नाही.
कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४९२६७ वर पोहोचली आहे. ४७४०५ जण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शिवाय १६९१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत १७१ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी ग्रामीण व नगरपालिका हद्दीत सहा, तर कोल्हापूर शहरात सुमारे ६२ अशा एकूण ६८ रुग्णांना लक्षणे नसल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.