कोरोना रुग्ण व मृत्युसंख्याही स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:20 AM2021-07-17T04:20:42+5:302021-07-17T04:20:42+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोराेनाबाधितांची संख्या सलग चौथ्या दिवशी घटली असून, ती २११ वर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोराेनाबाधितांची संख्या सलग चौथ्या दिवशी घटली असून, ती २११ वर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच रग्णसंख्येत शहर तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. मात्र, अजूनही मृत्यू जास्त असल्याने चिंता कायम आहे. करवीरमध्ये सर्वाधिक २७६ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ हातकणंगलेची २१२ एवढी रुग्णसंख्या शुक्रवारी रुग्ण व मृत्यू स्थिर असून, नवे १३५६ रुग्ण तर २५ जणांचा बळी गेला आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली असलीतरी अजूनही मृत्यूचा आकडा जास्त असल्याने चिंता व्यक्त होत आहे. गुरुवारी १३२७ नवे बाधित आढळले होते. ती संख्या शुक्रवारी १३५६ झाली. किंचित वाढ दिसत असलीतरी कोल्हापूर शहरातील वाढीचा वेग ओसरू लागल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात गुरुवारी २९१ रुग्ण आढळले होते, ते शुक्रवारी २११ पर्यंत खाली आले.
शहरात जोर ओसरत असताना ग्रामीणमध्ये पुन्हा वाढ होऊ लागल्याने करवीर आणि हातकणंगलेतील रुग्णसंख्येवरून दिसत आहे. हातकणंगलेत मृत्यूही सहा झाल्याने या तालुक्यावर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
आजचे मृत्यू
कोल्हापूर शहर : ०६ कसबा बावडा, महालक्ष्मी कॉलनी, रिंगरोड बोंद्रेनगर, अंबाई टॅंक, शुक्रवार पेठ, लाईन बजार,
करवीर : ०१ इस्पुर्ली,
भुदरगड : ०१ गारगोटी,
हातकणंगले : ०६ कोरोची दोन, इचलकरंजी दोन, पारगाव, हातकणंगले,
शिरोेळ : ०१ घोसरवाड,
राधानगरी : ०२ पालकरवाडी, मजरे कासारवाडा,
आजरा : ०२ हाजगोळी, सरबंळवाडी,
पन्हाळा : ०२ यवलूज, केर्ली,
कागल : ०१ मांगनूर,
इतर जिल्हा : ०२ चिंदूर (मालवण), नागाव (वाळवा)