कोरोना रुग्णसंख्या कमी पण मृत्यू वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:23 AM2021-07-26T04:23:01+5:302021-07-26T04:23:01+5:30
कोल्हापूर: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी पुन्हा मृत्यूसंख्या वाढली आहे. नवे ६७७ ...
कोल्हापूर: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी पुन्हा मृत्यूसंख्या वाढली आहे. नवे ६७७ रुग्ण नोंदवण्यात आले असून २० जणांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर शहरात १४८, करवीर १०२,हातकणंगले ८७ अशा नव्या रुग्णांची आकडेवारी असून सर्वाधिक मृत्यू करवीर तालुक्यातील झाले आहेत. कोल्हापूर शहरामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जवळपास नव्या रुग्णांपेक्षा दुप्पट म्हणजे १३०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ११ हजार २३४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.
चौकट
तालुकावार मृत्यू
करवीर ०६
निगवे, हळदी, वळिवडे, सावरवाडी, नेर्ली, वडणगे
कोल्हापूर शहर ०५
रविवार पेठ, साने गुरुजी वसाहत २, कसबा बावडा, जाधववाडी
हातकणंगले ०२
कोरोची, तरसंबळे
भुदरगड ०२
गडबिद्री, फणसवाडी
गडहिंग्लज ०१
नेसरी
कागल ०१
पिराचीवाडी
शाहूवाडी ०१
सोनुर्ले
इतर जिल्हा ०१
म्हसवड जि. सातारा